सुभाष मैदान बचाव समितीचा इनडोअर
स्टेडियमला विरोध कायम
नवीन आराखडा तयार करून काम सुरू
करणार
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याणमधील सुभाष मैदानात होऊ घातलेल्या इनडोअर स्टेडियमला कल्याणकर नागरिक आणि क्रीडा प्रेमींचा विरोध कायम असून आज या ठिकाणी आलेल्या माजी केंद्रीय मंत्री माजी खासदार कपिल पाटील यांना या नागरिकांनी आणि खेळाडुंनी घेराव घालत विरोध दर्शविला. सुभाष मैदानातील एक इंच देखील जागा या इनडोअर स्टेडियमसाठी घेऊन देणार नाही असा पवित्रा या नगरिकांनी घेतला. यांवर या मैदानाला लागून असेलल्या नक्षत्र उद्यानात हे स्टेडियम उभारण्याचा आरखडा तयार करून हा आराखडा नागरिक आणि क्रीडा प्रेमींना दाखवूनच हे काम सुरू करण्याचे आश्वासन कपिल पाटील यांनी दिले.
महापालिकेच्या शेजारी असलेले सुभाष मैदान, याबाबतीत जनतेने व क्रीडाप्रेमींनी हे मैदान महापालिकेने कोणतेही टेंडर काढू नये व बांधकाम करू नये याकरिता आंदोलन केले होते. महापालिकेकडे याची मालकी नाही अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर यांनी उघडकीस आणली असून ही जर माहिती खरी असेल तर महापालिकेने केंद्रशासनाची दिशाभूल करून निधी प्राप्त केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सुभाष मैदान वाचविण्यासाठी शुक्रवारी सुभाष मैदान ते महापालिका मुख्यालय असा मोर्चा आयोजित केला आहे. त्यासही क्रिडाप्रेमी कल्याण डोंबिवलीच्या नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन घाणेकर यांनी केले आहे.
कपिल पाटील यांनी नागरिक आणि क्रीडाप्रेमी यांच्या या प्रकल्पास हरकती काय आहेत याची माहिती समजून घेतली. शहर अभियंता अनिता परदेशी यांना सुभाष मैदान बचाव समितीच्या मागण्यानुसार मैदानात कोणतेही बांधकाम न करता मैदानाच्या बाहेर काही बांधकाम करता येते का याचा डीपीआर नव्याने बनवायला सांगितला आहे. तशा लेखी सूचना सुद्धा महापालिका अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. नवीन प्लॅन बनेपर्यंत आत्ता आहे त्या स्थितीत मैदान राहणार आहे.
Post a Comment
0 Comments