ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड़ यांच्या निर्देशानुसार, आय प्रभागाचे सहा.आयुक्त भारत पवार व त्यांच्या पथकाने आणि महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी यांनी संयुक्तरित्या कल्याण (पूर्व) चिंचपाडा येथील नैसर्गिक वातावरण प्रदूषित करणाऱ्या 22 जीन्स कारखान्यांवर निष्कासनाची धडक कारवाई केली. हि कारवाई अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे कर्मचारी, फेरीवाला हटाव पथकातील कर्मचारी व महापालिका पोलीस अधिकारीकर्मचारी यांच्या मदतीने आणि 1 जेसीबी व 10 मजूर यांच्या सहाय्याने करण्यात आली.
Post a Comment
0 Comments