Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

मराठी भाषा संवर्धन पंधरवडयाचा सांगता सोहळा संपन्न

  

            ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

राठी भाषा संवर्धनासाठी राज्य शासनाच्या निर्देशानुसार व कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांच्या निर्देशानुसार मराठी भाषा संवर्धन पंधरवडयाचा सांगता सोहळा दि.२८ जानेवारी रोजी कल्याण पश्चिम येथील सिटी पार्क येथे उत्साहात संपन्न झाला. यावेळी महापालिकेने अधिकारी व कर्मचारी वर्गासाठी मराठी गीत गायन स्पर्धामराठी हस्ताक्षर स्पर्धाचारोळी स्पर्धा आणि महापालिकेच्या शालेय विदयार्थ्यांसाठी मराठी निबंध स्पर्धाम्हणीवाकप्रचार स्पर्धा इतर महापालिका क्षेत्रातील महाविदयालयातील विदयार्थ्यांनी पेहराव मराठी भाषा स्पर्धालावणी स्पर्धा इत्यादी स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते.


त्याचबरोबर मराठी भाषेचे वैभव जपणेमराठी भाषेचे संवर्धन करणेमराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर करणे आवश्यक असून त्यादृष्टीने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या विविध कार्यक्रमांमध्ये बिर्ला महाविद्यालयातील विदयार्थ्यांनी एक झाड एक कवितापथनाटयसोनावणे महाविद्यालयातील विदयार्थ्यांनी अक्षर दिंडीमंगळागौरप्रगती महाविद्यालयातील विदयार्थ्यांनी शिवचरित्र असे बहारदार कार्यक्रम सादर केले.

हा कार्यक्रम बिर्ला महाविद्यालयाचे संचालक डॉ. नरेश चंद्रउपआयुक्त प्रसाद बोरकरसंजय जाधव व इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी विविध महाविद्यालयातील प्राध्यापकविदयार्थीपालकनागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन महापालिका सचिव तथा मराठी भाषा अधिकारी किशोर शेळके यांनी केले.


Post a Comment

0 Comments