Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून 34 ग्राम एमडी सोबत एकाला अटक

    

                    ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 
अंमली पदार्थ विरोधात पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या पथकाने मोठी कारवाई केली असून 34 ग्राम एमडी सोबत एकाला अटक करण्यात आली आहे.  विनय अय्यर असे अटक आरोपीचे नाव असून विनय हा डोंबिवलीतील नामांकित शाळा आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांना एमडी ड्रग विकतो.  गेल्या चार दिवसांत कल्याण डोंबिवलीतील विविध ठिकाणाहून गांजा देखील जप्त करण्यात आला आहे.

परिमंडळ 3 चे पोलीस उपआयुक्त अतुल झेंडे यांच्या कार्यक्षेत्रात 1 जानेवारी ते 10 जानेवारी या कालावधी मध्ये अंमली पदार्थ विरोधी कायदया अंतर्गत तसेच इतर कायदयान्वये  परिमंडळ 3 स्थरावर स्वतंत्र पथक नेमुन कारवाई करण्यात आली. या कारवाईत शुक्रवारी रात्री  1 वाजण्याच्या   सुमारास डोंबिवली पूर्वेतील नंदी पॅलेस हॉटेल जवळ, एम.आय.डी.सी रोडवर  विनय अय्यर, वय २६ वर्षे, हा संशयास्पत रित्या मिळुन आल्याने त्यांच्याकडे विचारपुस करता त्यांच्याकडे "मेफेड्रॉन' (एमडी) हा अंमली पदार्थ असल्याचे सांगितल्याने.  त्यांच्यावर कारवाई करण्यात आली असुन त्यांच्याकडुन विक्रीसाठी घेवुन आलेला ३४ ग्रॅम वजनाचा "मेफेड्रॉन' (एमडी) हा अंमली पदार्थ जप्त करून मानपाडा पोलीस स्टेशन मध्ये एन.डी.पी.एस. अॅक्ट  प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला  असल्याची माहिती पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली.

Post a Comment

0 Comments