ब्लॅक अँड व्हाईट अंबरनाथ वार्ताहर
उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” हा उपक्रम विविध स्तरावर राबवीत आहे. म्हणूनच १ जानेवारी ते १५ जानेवारी हा महावाचन पंधरवडा म्हणून साजरा करण्यात येतोय. अंबरनाथ नगरपरिषद संचालित शिवप्रेरणा ग्रंथालय अंबरनाथ (पश्चिम) येथे वाचन यज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. तीन दिवसात सुमारे १८० विद्यार्थ्यांनी वाचन यज्ञात सहभाग घेतला. यावेळी त्यांच्याशी “वाचन संवाद” साधण्यासाठी रंगकर्मी, संपादक, लेखक सुधीर चित्ते यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
वाचन कौशल्य कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यासाठी सुप्रसिद्ध वृत्त निवेदक, ग्रंथपाल आणि लेखक अमेय रानडे यांनी वाचन का करायचं, कसं करायचं, वाचनातील बारकावे याबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले.
एकाच वेळी विद्यार्थ्यांना अनेक पुस्तकांची ओळख व्हावी, त्यांच्यात पुस्तकाबद्दल कुतूहल निर्माण व्हावं आणि त्यांनी ग्रंथालयात येऊन पुस्तकांचं वाचन करावं यासाठी या संपूर्ण उपक्रमाचे आयोजन अशी माहिती ग्रंथालयाच्या ग्रंथपाल तपस्या नेवे यांनी दिली. या उपक्रमात अंबरनाथ मधील चार शाळांचा सहभाग होता. त्यात महात्मा गांधी विद्यालय, पूर्व, ज्ञानामृत विद्यालय आणि कोळकर विद्यालय या शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले होते.
.jpg)




Post a Comment
0 Comments