"अशी प्रवृत्ती मोडून तोडून ठेचून काढली पाहिजे. जो उद्योजक येतो तो अनेकांना रोजगार देत असतो बेरोजगारी दूर करत असतो. एखाद्या उद्योजकाला खंडणीसाठी धमकी दिल्यास सरकार त्यांना पूर्ण संरक्षण देईल.." उद्योग मंत्री उदय सामंत
ब्लॅक अँड व्हाईट मुंबई वृत्तसेवा
उद्योजकांना खंडणीसाठी जर कोणा माफियानं किंवा गुंडानं धमकी दिल्यास त्यांनी पुढे येऊन त्यावर बोलावं, सरकार त्यांना संरक्षण देईल अशी ग्वाही राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.राज्यातील उद्योग आणि मराठी भाषा यासंर्भात आढावा बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना ते बोल
राज्यात उद्योजकांना अनेक ठिकाणी खंडणीसाठी काही लोक फोन करतात, मग अशा वातावरणात महाराष्ट्रात उद्योजक कसे राहतील? अशा आशयाचा प्रश्न पत्रकारांनी सामंत यांना विचारला. यावर उत्तर देताना सामंत म्हणाले की, "अशी प्रवृत्ती मोडून तोडून ठेचून काढली पाहिजे. जो उद्योजक येतो तो अनेकांना रोजगार देत असतो बेरोजगारी दूर करत असतो. एखादया उद्योजकाला जर कोणी जाणीवपूर्वक त्रास द्यायचा प्रयत्न करत असेल तर त्याच्यासाठी देखील प्रशासन आहे.
पण जाणीवपूर्वक खंडणी मागण्याचा जर कोणी प्रयत्न करत असेल तर त्या उद्योजकानं पुढे यावं, त्या उद्योजकाला संरक्षण दिलं जाईल. तसंच जी प्रवृत्ती त्यांच्याविरोधात खंडणी मागण्याचा प्रयत्न करते आहे, त्यांना जेलचीच हवा भोगावी लागेल. ही प्रवृत्ती संपूर्ण महाराष्ट्रातून उखडून टाकण्यासाठी सरकार या उद्योजकांसोबत आहे"
बीडचा वाल्मिक कराड खंडणी प्रकरणी तुरुंगात
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण सध्या महाराष्ट्रात चर्चेत आहे. याप्रकरणातील घडामोडींनुसार मस्साजोग इथं पवनचक्की प्रकल्प उभारणाऱ्या अवादा एनर्जी कंपनीच्या कर्मचाऱ्यानं खंडणी प्रकरणी पोलिसांत तक्रार दिली होती. संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी हत्या झाल्यानंतर दोनच दिवसांनी सुदर्शन घुले, विष्णू चाटे अन् वाल्मिक कराड यांनी या कंपनीकडं दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. याच खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड हा पुण्यात सीआयडीसमोर शरण आला होता. त्यानंतर तो आता सीआयडीच्या कोठडीत आहे.
बीडचं हे प्रकरण ताजं असलं तरी राज्यात विविध भागांत उद्योजकांना धमकावण्याचे आणि खंडणी गोळा करण्याचे प्रकार घडतच आहेत. यापार्श्वभूमीवर जर राज्यात उद्योजकांना निर्धोक वातावरण नसेल तर उद्योजक आणि पर्यायानं उद्योग राहतील कसे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. यापार्श्वभूमीवर खंडणीसाठी धमकी आल्यास उद्योजकाची तक्रार आल्यास सरकार त्यांना संरक्षण देईल असं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे.
.jpg)

Post a Comment
0 Comments