Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

बांधकाम व्यवसायाला घरघर

बांधकाम व्यवसायाला घरघर 

केडीएमसी क्षेत्रात                        प्रकल्प कागदावर

            ब्लॅक अँड व्हाईट (डोंबिवली ): बापू वैद्य 

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या क्षेत्रात अनेक प्रकल्प जाहीर होऊन त्या कामाला गती प्राप्त होतांना दिसत नाही.
मेट्रो ५ प्रकल्प हा २०१७ला जाहीर झाला असून पण सदर प्रकल्प होणार आहे का हा प्रश्न उपस्थित होत आहे.रिंगरूट त्यातही अनेक अडचणी निर्माण होत आहे.या प्रकल्पावर इन्फ्रस्ट्क्चर विषयावर अनेकदा चर्चा झाल्या परंतु फक्त कागदावर आराखडे झाले.असे अनेक प्रकारचे प्रकल्प जाहीर केले गेले आहेत पण प्रत्यक्षात सर्वांवर फक्त चर्चा नी चर्चा या पलिकडे काय.विद्यमान आयुक्त आठवड्यात तीन चारदा अधिकारी वर्गाच्या सकाळपासून बैठका घेतल्या जातात.पण त्यातून फलनिष्पत्ती काय हा प्रश्न उपस्थित होत आहे.अधिकारी खाजगी बोलताना दिसतात आमचा वेळ होत असलेल्या बैठकांमध्ये जातो.त्यामुळे हातात असलेल्या कामाकडे दुर्लक्ष होत असते.यासर्वामुळे कल्याण डोंबिवली मध्ये घर घेण्यासाठी पसंती न देता ते ठाणे अंबरनाथ बदलापूर या ठिकाला पस़ती देताना दिसतात.
प्रख्यात बांधकाम व्यावसायिक रवी पाटील यावर बोलताना म्हणाले, अर्धवट प्रकल्प कधी तयार होणार यामुळे विकासक या ठिकाणी घरकुल प्रकल्पात गुंतवणूक करण्यासाठी धजत नाही.
मोठागांव,दुर्गाडी,रिंग रूट,समृधी हायवे ठाण्यापर्यंत जोडले व प्रत्यक्ष वाहतूक सुरू झाली.
टिटवाळा रिंग रूट,शीळफाटा येथील उड्डाणपूल, पत्री पुलाजवळ तिसरा उड्डाण पूल हे सर्व अस्तित्वात येऊन जोपर्यंत इन्फ्रस्ट्क्चर उभे राहत नाही, तसेच रस्त्याचे जाळे विणले जात नाही तोपर्यंत इथल्या घरांना ठाणे मुलुंडसारखी मागणी येणे कठीण जात असल्याने विकासक घरांना साठी गुंतवणूक करण्यासाठी धजत नाही हे लक्षात घेतले पाहिजे.

Tags

Post a Comment

0 Comments