निवडणुकीत सहकार्य करणाऱ्यांचा खडकपाडा पोलिसांनी केला सन्मान
ब्लॅक अँड व्हाईट
कल्याण वार्ताहर: नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीमध्ये बंदोबस्त कामी मनुष्यबळ अपुरे पडत असल्याने हि उणीव लक्षात घेऊन परिमंडल ३ चे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी परिमंडळ तीन मधील सर्व पोलीस स्टेशनला कॉलेजचे एनसीसी व एनएसएसचे विद्यार्थी यांची विशेष पोलीस अधिकारी म्हणून मदत घेण्याबाबत सुचविले होते.
त्याप्रमाणे खडकपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ अमरनाथ वाघमोडे यांनी के. एम. अग्रवाल कॉलेज गांधारी व एल. डी. सोनवणे कॉलेज वाडेघर कल्याण यांच्याशी संपर्क साधून त्यांना निवडणूक बंदोबस कामी एनसीसी, एनएसएस विद्यार्थी मदतीस देण्यासाठी आवाहन केले. त्याप्रमाणे अग्रवाल कॉलेजचे एनसीसी २५ विद्यार्थी व सोनवणे कॉलेजचे एनएसएसचे २५ विद्यार्थी उपलब्ध झाले होते. या विद्यार्थ्यांनी मतदान केंद्रावर पोलिसांच्या सूचनेप्रमाणे नागरिकांच्या रांगा लावणे, ज्येष्ठ नागरिकांना मदत करणे असे महत्त्वाची कामे केल्याने पोलीस विभागांना त्यांची फार मोठी मदत झाली. याची जाणीव ठेवून पोलीस उपयुक्त परिमंडळ 3 कल्याण यांनी अशा सर्व विशेष पोलीस अधिकारी यांचा व निवडणूक काळात मदत करणारे इतर पोलीस मित्र यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्याचे आदेश दिले होते.
खडकपाडा पोलीस स्टेशन येथे या सर्व एनसीसीचे व एनएसएसचे विद्यार्थी आणि पोलीस मित्र यांचा विशेश पोलीस अधिकारी म्हणून त्याचप्रमाणे निवडणूक काळामध्ये बाहेर गावाहून बंदोबस्त करिता आलेले पोलीस, होमगार्ड यांची राहण्याची व्यवस्था करणारे ब्रायटन वर्ल्ड स्कूलचे संचालक पंकज वीर, वाहने पुरविणारे दुर्गा टूर्स ट्रॅव्हल्सचे विश्वंभर डोमाडे, जेवण पुरविणारे लक्ष्मी केटरर्सचे संध्या सोनार, ड्रोन ऑपरेटर अद्वैत ढाकणे, सर्व पोलिस वाहनावर पी ए सिस्टीम पुरविणारे प्रमोद गावडे बंदोबस्ताचे लोकांकरिता कार्पेट व इतर व्यवस्था पुरविणारे अरुण चव्हाण यांचा देखील विशेष सन्मान यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांच्या हस्ते करण्यात आला.
त्याचप्रमाणे डॉ अमरनाथ वाघमोडे, पोलीस निरीक्षक संदीप शिवले, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक अंबिका घस्ते यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र आणि गुलाब पुष्प देऊन करण्यात आला. पोलिसांनी आपल्या कामाची घेतलेली दखल व केलेला सन्मान यामुळे सर्व विद्यार्थी व पोलीस मित्र आनंदी झाले असल्याचे दिसून आले. यावेळी विद्यार्थ्यांनी व पोलीस मित्र यांनी पोलीस बंदोबस्त दरम्यान आपल्याला आलेले अनुभव कथन केले. पोलिसांबरोबर काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल तसेच केलेल्या सन्मानाबद्दल आभार व्यक्त केले.
.jpg)


Post a Comment
0 Comments