24 तास उपलब्ध असणारा आणि सुख दुःखात धावून येणारा कार्यकर्ता निवडून द्या
- खासदार डॉ श्रीकांत शिंदे
महायुती उमेदवार राजेश मोरे यांच्या मध्यावर्ती निवडणूक कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी खा.डॉ. शिंदे यांचे आवाहन
ब्लॅक अँड व्हाईट/कल्याण वार्ताहर
कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील शिवसेना भाजप राष्ट्रवादी आणि आर पी आय महायुतीचे उमेदवार राजेश मोरे यांच्या मध्यवर्ती निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन खा.डॉ. शिंदे यांच्या प्रमूख उपस्थितीत करण्यात आले.
-------------_-----------------------_-----------------_----------------
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजेश मोरे या सामान्य कार्यकर्त्याला संधी दिली असून 24 तास उपलब्ध असणाऱ्या आणि सुख दुःखात धावून येणाऱ्या राजेश मोरे यांच्यासारख्या कार्यकर्त्याला निवडून देण्यासाठी झटून काम करण्याचे आवाहन कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केले आहे.
कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील शिवसेना भाजप राष्ट्रवादी आणि आर पी आय महायुतीचे उमेदवार राजेश मोरे यांच्या मध्यवर्ती निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन खा.डॉ. शिंदे यांच्या प्रमूख उपस्थितीत करण्यात आले.
आपल्या पक्षामध्ये राजेश मोरे यांना संधी दिल्याने सामान्य कार्यकर्त्यामध्ये ऊर्जा आणि आनंदाचे वातावरण आहे. तर राजा का बेटा राजा नाही बनेगा, यानुसार सगळीकडे कार्यकर्त्याला संधी देण्यात आली आहे. आपण सगळ्यांना एकत्रित घेऊन विकास करण्याचे काम करतोय, महायुतीचे सगळे कार्यकर्ते कामाला लागले असून यावेळेस कल्याण लोकसभा मतदारसंघांतील महायुतीच्या जागा 100 टक्के निवडून येणार असल्याचा विश्वास खासदार डॉ. शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.
तर राजेश मोरे यांना भेटायला कोणत्याही अपॉइंटमेंटची गरज भासत नाही. आमदार म्हणून निवडून आल्यावरही त्यांची अशीच कार्यपद्धती राहणार असून आपल्याला 24 तास उपलब्ध असणारा आणि आपल्या सुखदुखात धावून येणारा लोकप्रतिनिधी पाहिजे असल्याचे मत खा. डॉ. शिंदे यांनी व्यक्त करत राजेश मोरे यांना बहुमताने विजयी करण्यासाठी मेहनत घेण्याची गरज व्यक्त केली.
यावेळी उपस्थित महायुतीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना महायुती उमेदवार राजेश मोरे यांनी सांगितले की आपल्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर विश्वास ठेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उमेदवारी दिली आहे. हा कल्याण ग्रामीणचा गड दोन वेळा आपल्या हातून गेला असला तरी तो परत मिळवायचा आहे. मेहनत करा, लोकसभेला खासदार डॉ. शिंदे साहेबांनी जशी रात्रंदिवस मेहनत घेतली, तशाचप्रकारे आपल्याला मेहनत करावी लागेल असे आवाहन राजेश मोरे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, भाजप जिल्हाध्यक्ष नाना सुर्यवंशी, आरपीआय जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, भाजप कल्याण ग्रामीणचे महेश पाटील, माजी उप महापौर मोरेश्वर भोईर, महिला आघाडीच्या प्रमुख लता पाटील, माजी नगरसेवक जालिंदर पाटील, अर्जुन पाटील, रमाकांत पाटील, 27 गाव संघर्ष समितीचे गुलाब वझे, नंदू परब, शैलेश पाटील, यांच्यासह शिवसेना भाजप राष्ट्रवादी रिपाइंचे सर्व पदाधिकारी आणि महिला आघाडीच्या प्रमुख आणि सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.jpg)



Post a Comment
0 Comments