कोण होणार शहापूरच्या जनतेचा आमदार
विधानसभा निवडणुकीत सर्वत्र संभ्रमाचे वातावरण
ब्लॅक अँड व्हाईट/शहापूर प्रतिनिधी
यंदाच्या 2024 च्या 135 विधानसभा निवडणुकीची धामधूम सर्वत्र चालू आहे आणि यातच शहापूरमध्ये तिरंगी लढत होण्याचे चिन्ह सर्वत्र दिसत आहे. महायुतीचे उमेदवार दौलत दरोडा महाविकास आघाडीचे उमेदवार,पांडुरंग बरोरा, जिजाऊ सामाजिक संस्था पुरस्कृत अपक्ष उमेदवार म्हणून रंजना उघडा लढत आहेत, याविषयीं तालुक्यात जनसामान्यांत एकच चर्चा आहे कि,आमचा आमदार कोण होणार ?
जनतेच्या अनेक समस्या, तालुक्याचा विविध प्रकारचा विकास आणि अनेक प्रश्न तसेच जनतेच्या सुखदुःखात सहभागी होणाऱ्या, शिक्षण,आरोग्य, रस्ते, लाईट, रेल्वे समस्या रोजगार असे अनेक प्रश्न तालुक्यात आहेत आणि पुन्हा एकदा जनतेला प्रश्न पडला आहे कि, या सर्व समस्या सोडवण्यासाठी आमचा आमदार कोण होणार?
.jpg)

Post a Comment
0 Comments