Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

मंत्री रवींद्र चव्हाण यांचा पालघर ते सिंधुदुर्ग व्हाया डोंबिवली झंझावाती दौरा

 मंत्री रवींद्र चव्हाण यांचा पालघर ते सिंधुदुर्ग व्हाया डोंबिवली झंझावाती दौरा

आबालवृद्ध नागरिकांचा मिळतोय प्रचंड प्रतिसाद




                  ब्लॅक अँड व्हाईट/कल्याण वार्ताहर 

सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचा सोमवारपासून पालघर ते सिंधुदुर्ग असा झंझावाती प्रचार दौरा सुरू असून त्यांच्या प्रचाराला सर्वत्र प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. आबालवृद्ध नागरिक त्यांचे मनोमन स्वागत करत  आहेत. पालघर, वसई, वाडा, भिवंडी, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, पाली, महड, रायगड, कर्जत, चिपळूण, रत्नागिरी, लांजा, कुडाळ, सिंधुदुर्ग या सर्व ठिकाणी त्यांना उदंड प्रतिसाद मिळत असून मतदारांमध्ये प्रचंड उत्साह असल्याचे जाणवत आहे असे ठिकठिकाणी दिसून आल्याचे मंत्री चव्हाण म्हणाले.

खासदार नारायण राणे, मंत्री उदय सामंत, खासदार सुनील तटकरे, अदिती तटकरे यांसह प्रशांत ठाकूर, गणेश नाईक आदी सर्व नेतेमंडळी भरपूर कार्यरत असून कोकणात बहुतांशी ठिकाणी महायुतीला यश मिळणार असल्याचे आशीर्वाद नागरिकांनी दिले. नवं मतदाराना पहिल्यांदाच संधी असल्याने त्यांना भरपुर उत्साह आहे. मंत्री चव्हाण यांच्या साधी राहणी आणि जीन्स पॅन्ट, चेक्स शर्टने युवकांना भुरळ घातली असून आपल्यातले मंत्री अशी भावना नागरिकांनी व्यक्त केल्याचे सर्वत्र ऐकिवात आले.
----------

Post a Comment

0 Comments