Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

सर्वसामान्यांच्या हाकेला धावून जाणारा नेता म्हणजे राजेश मोरे

 सर्वसामान्यांच्या हाकेला धावून जाणारा नेता म्हणजे राजेश मोरे 

पलावा परिसरात प्रचाराचा झंजावात 


                 ब्लॅक अँड व्हाईट/कल्याण वार्ताहर

 कोणत्याही वेळी सर्वसामान्य नागरिकांच्या हाकेला धावून जात त्याला हवी असलेली मदत करणारा सर्वसामान्यांच्या मधला नेता म्हणजे राजेश मोरे. कोणत्याही वेळी उपस्थित राहून जनतेचे प्रश्न सोडविणार्या एका प्रामाणिक कार्यकर्त्याला शिवसेनेने  दिलेली उमेदवारी हा जनतेचा सन्मान आहे असे मत सर्वसामान्य नागरिकांनी मांडले. विधानसभा निवडणुकीत कल्याण ग्रामीण मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाच्या वतीने निवडणूक लढवत असलेले राजेश मोरे यांनी आपल्या प्रचाराचा वेग वाढवला आहे. गुरुवारी सकाळी त्यांच्या प्रचार दौऱ्याला कासाबेला गोल्ड येथून सुरुवात झाली. यावेळी कार्यकर्त्यांनी फटाके फोडून ढोल ताशांच्या गजरात राजेश मोरे यांचे स्वागत केले. या रॅलीत राजेश मोरे यांना आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांनी आपल्या भावना मांडल्या.

कमीत कमी वेळात प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचता यावे यासाठी प्रभाग निहाय पदयात्रेचे नियोजन कल्याण ग्रामीणचे शिवसेनेचे राजेश मोरे यांनी केले आहे. गुरुवारी  प्रचाराची सुरुवात कासाबेला परिसरातून करण्यात आली. कासाबेला गोल्ड, लोढा हेवन,जय भवानी चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, ग्रीन पार्क तीन नंबर गेट, कॅस्पेनिया सोसायटी, शिवसेना शाखा पलावा, निळजेगाव, वडवली गाव हेदुटने  गाव, कोळेगाव येथून दत्त मंदिरात दर्शन घेऊन पदयात्रेचा समारोप करण्यात आला तर दुपारी डोंबिवली पूर्वेकडील अय्यप्पा मंदिरात दर्शन घेऊन  राजाजी पथ, आयरेगाव, तुकाराम नगर, बहिणाबाई उद्यान, नांदिवली नाला, एकता नगर,संगीता वाडी, दत्तनगर कडून दीडशे फुटी झेंडा चौकात पदयात्रेचा समारोप करण्यात आला.

पलावा चौकातून दुचाकी आणि रिक्षांची रॅली आणि कार्यकर्त्यांच्या साथीने पदयात्रेचा शुभारंभ करण्यात आला. शिवसेना पदाधिकारी गजानन पाटील, सुभाष पाटील , नगरसेविका पूजा पाटील, अमोल भोगले, सतरपाल सिंग,भाजप पदाधिकारी रवी पाटील, सतीश सिंग, नागेंद्र शर्मा या शिवसेना भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी रॅलीचे आयोजन केले होते. जागोजागी नागरिकांनी उस्फूर्तपणे स्वागत करत ज्येष्ठांनी त्यांना आशीर्वाद दिला.

Post a Comment

0 Comments