Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

कल्याण ग्रामीण मतदार संघातील समस्यांसाठी लढण्याचा अपक्ष उमेदवार प्रियांका मयेकरांचा निर्धार

 कल्याण ग्रामीण मतदार संघातील समस्यांसाठी लढण्याचा 

अपक्ष उमेदवार प्रियांका मयेकरांचा निर्धार

                ब्लॅक अँड व्हाईट/डोंबिवली वार्ताहर 

 कल्याण डोंबिवलीतील ग्रामीण भागातील विकासासाठी आपण लढणार असून,त्यासाठी कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवित असल्याचे अपक्ष उमेदवार प्रियांका मयेकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.ग्रामीण भागात वीज, पाणी, रस्ते, प्राथमिक आणि उच्च शिक्षणापासून अनेक समाज घटक वंचित आहेत.त्या घटकांच्या न्याय हक्कासाठी लढणारी आहे,  दस्तनोंदणी बंदमुळे सामान्य नागरिक आणि शासनाला आर्थिक फटका बसला आहे.त्यामुळे दस्त नोंदणी सुरु करावी.

ठाकुर्ली, डोंबिवली, कोपर, दिवा येथुन ग्रामीण भागात वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी प्रयत्नशील रहाणार आहे.लाडकी बहिण योजनेमुळे महिला परावलंबी होत आहे.त्याऐवजी महिलांचे स्वावलंबन आणि रोजगार याकडे लक्ष देणारअसल्याचे अपक्ष उमेदवार प्रियांका मयेकर यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments