छत्रपती शिवाजी महाराजांचा
प्रताप सर्व दूर पसरवण्यास
सज्ज झाल्या 45 गृहिणी
ब्लॅक अँड व्हाईट (कल्याण )
विधानसभेच्या निवडणुकांचा निकाल काय लागेल याकडे सर्व महिला व पुरुषांचे डोळे लागलेले असताना विनया असोसिएटचे प्रविण राणे दिग्दर्शित, सह दिग्दर्शक मिलिंद सुर्वे आणि विशेष सहकार्य गणेश तळेकर यांच्या सौजन्याने मात्र फक्त लहान मुला मुलींसाठी 45 महिला कलाकारांनी शिवप्रताप हे ऐतिहासिक महानाटक अत्रे रंगमंदिर येथे साकारले.
बालगोपाळांसाठी आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास प्रत्यक्षात "शिवप्रताप" हे नाटक रंगमंचावर तब्बल 45 महिला ज्या गृहिणी आहेत त्यांनी कल्याण येथील आचार्य अत्रे नाटय मंदिर येथे सादर करून बालगोपाल आणि पालक यांची मने तर जिंकलीच त्याबरोबर त्यांच्यामध्ये एक स्फुरण व चैतन्य निर्माण केले. अतिशय उत्स्फूर्त तसेच प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटात प्रतिसाद या मुलांनी दिला.
खास वैशिष्ट्य म्हणजे एलईडी स्क्रीनमुळे प्रसंग प्रत्यक्ष ठिकाणी घडत असल्याचा फील येत होता. कल्याण डोंबिवली महानगरातील खास बालकलाकार, विद्यार्थी, शिक्षक, पालक, बालसंस्था यांच्यासाठी ही एक पर्वणीच होती. आपण आपल्या भागात असे महानाट्य "शिवप्रताप" लावावे असे आवाहन निर्माता दिग्दर्शक प्रवीण राणे, श्रुती परब यांनी केले व हा प्रयोग यशस्वी होण्यासाठी शिवाजी शिंदे, सतीश देसाई, सुरेखा गावंडे, ललिता मोरे, महेश कापडोस्कर, बाबू राणे यांनी खूप मदत केली.
.jpg)


Post a Comment
0 Comments