Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

सुलभा गायकवाड यांचा रॅलीच्या माध्यमातून प्रचाराचा प्रारंभ

 तिसाई गावदेवीचे दर्शन घेत सुलभा गायकवाड यांचा रॅलीच्या माध्यमातून प्रचाराचा प्रारंभ



ब्लॅक अँड व्हाईट/कल्याण वार्ताहर

 विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या अधिकृत उमेदवार सुलभा गणपत गायकवाड यांच्यातर्फे प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले होते. तिसाई देवी तसेच गावदेवी मातेचे दर्शन घेऊन या प्रचार फेरीची सुरुवात झाली.या प्रचारफेरीमध्ये सुलभा गणपत गायकवाड यांच्या समर्थनार्थ शेकडो कार्यकर्ते आणि महिला वर्ग सहभागी झाला होता. या प्रचारफेरीच्या माध्यमातून एकप्रकारे जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. आमदार गणपत गायकवाड यांनी तळागाळात उतरून केलेली विकासकामे आणि नागरिकांची केलेली अथक सेवा यांच्या बळावर मतदार राजा आपल्याला भरघोस मतांनी निवडून देतील असा विश्वास यावेळी भाजपतर्फे व्यक्त करण्यात आला

या प्रचारफेरीला माजी मंत्री तसेच ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील, भगवान भोईर, भाजपा जिल्हाध्यक्ष नरेंद्र (नाना) सूर्यवंशी, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा रेखा चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अर्जुन नायर,  जिल्हा उपाध्यक्ष सुभाष म्हस्के, माजी नगरसेवक अभिमन्यू गायकवाड, दत्ता गायकवाड, मा. नगरसेविका हेमलता पावशे, इंदिरा तरे, संगीता गायकवाड, समाजसेवक संजय गायकवाड, सुदाम पावशे यांच्यासह अनेक ग्रामस्थ मान्यवार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने  उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments