Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

डोंबिवलीकरांचे समाधान हेच माझे ध्येय आहे,- रवींद्र चव्हाण

 विकास म्हात्रे म्हणजे दिलेला शब्द जपणारा माझा मित्र : मंत्री रवींद्र चव्हाण*


डोंबिवलीकरांचे समाधान हेच माझे ध्येय आहे...रवींद्र चव्हाण 

               ब्लॅक अँड व्हाईट/डोंबिवली वार्ताहर 

 शहरातील सिद्धार्थ नगर, कुंभार पाडा, गरिबाचा वाडा या विभागातील नागरिकांचा मेळावा अलीकडेच संपन्न झाला. तो मेळावा भरवण्यासाठी माझे मित्र विकास म्हात्रे यांनी अपार मेहेनत घेतल्याचे दिसून आले, दिलेला शब्द पाळणारा मित्र अशा शब्दात मंत्री रविंद्र चव्हाण यांनी कौतुक केले.

"शहरात माझे अनेक भूमिपुत्र मान्यवर व्यक्तींशी माझे सलोख्याचे संबंध आहेत. राजकारणाच्याही आधी आमची मैत्री आहे. ती सगळ्यांनीच कायम ठेवत मैत्रीला प्राधान्य देऊन एकूणच सगळेच माझ्याशी अत्यंत प्रेम, आपुलकीने आहेत. हक्काने आवाज देणारी मित्रमंडळी माझ्या अवतीभोवती असल्याची मला नेहमी।जाण आहे. विकास म्हात्रे आणि त्यांचे कुटुंबीय हे त्यापैकी एक कुटुंब आहे हे सर्वश्रुत आहे."

त्या मेळाव्यात मंत्री चव्हाण यांनी नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेत त्यांचे निवारण केले.यावेळी सर्व उपस्थितांनी विधानसभा निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या.  त्या प्रसंगी व्यासपीठावर म्हात्रेंसह, राष्ट्रवादी डोंबिवली विधानसभा अध्यक्ष सुरेश जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments