शहापूर विधानसभा बहुजन विकाससेनेच्या अधिकृत उमेदवार रूपाली आरज (रमा बाळू शेंडे )
आशा पडवळ -तळेकर( शहापूर प्रतिनिधी )
सौ. रुपाली रविकांत आरज उर्फ ( रमा बाळू शेंडे ) माहेर आठगाव साक्रोली असून धसई विभागातून आहेत. त्यांचा सासर डोळखांब असून आरज कुटुंब म्हणजे कुणबी समाजाच्या त्या सुनबाई आहेत. त्यामुळे तालुक्यात 60 ते 65 :/: असलेला कुणबी समाज जागृक झाला असून त्यांची अस्मिता जागृत झाली आहे. पहिल्यांदा कुणब्यांची सून आमदार होणार, बहुजनांची मायलेक आमदार होणार असा योग शहापूर विधानसभा मतदार संघात जुळून आल्याने दुधात साखर पडल्यासारखे आहे. आणि कुणब्याची सून आमदार होणार अशी चर्चा सर्व गावागावात, खेड्यापाड्यात, शहरात होत आहे. त्यातच बहुजन विकास सेनेचे सर्वेसर्वा राजेश कुमार शिर्के मळेगाव( नारायण) गावचे असून Rps महाराष्ट्र राज्य या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून शहापूर तालुका, ठाणे जिल्ह्यात खूप मोठे समाजकार्य केले आहे. करत आहेत. Rps महाराष्ट्र राज्य संचलित सुरक्षा पोलीस अकॅडमी यांच्यामार्फत नाममात्र शुल्कात मार्गदर्शन व प्रशिक्षण देऊन आत्तापर्यंत 178 तरुण-तरुणी,पोलीस, फॉरेस्ट, मुंबई पोलीस भरती झालेले आहेत. तालुक्यात गावागावात 180 शाखा Rps प्रतिष्ठानच्या आणून त्यांच्यामार्फत रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, चष्मे वाटप शिबिर, वाचनालय,कबड्डीस्पर्धा, क्रिकेट स्पर्धा, दरवर्षी 5555 फळझाडे प्रत्येकी दोन याप्रमाणे वृक्ष लागवड व संवर्धन करून अनेक समाजपयोगी कामे करण्यात आली आहेत. तेच *राजेशकुमार शिर्के* आता *बहुजन विकास* *सेना या* पक्षाचे पक्षप्रमुख असून त्यांनीच या शहापूर विधानसभा मतदार संघातील तरुण,, बेरोजगार तरुणांना रोजगार देण्यासाठी 3 एमआयडीसी देण्यासाठी कष्टकरी तरुण वर्गासाठी गोडाऊन आणले. मायबाप शेतकऱ्यांसाठी शेतात 18 धरणे बांधणे यासाठी पक्षप्रमुख राजेश शिर्के यांनी .1 नंबर भक्कम पर्याय म्हणून शहापूर विधानसभेसाठी बहुजन विकास सेने तर्फे *सौ.रूपाली रमाकांत* *आरज उर्फ (रमा बाळू* *शेंडे* ) या उच्चशिक्षित शिक्षिका उमेदवार शहापूर तालुक्यातील मायबाप जनतेच्या दरबारात हजर केल्या आहेत. आणि शहापूर विधान संघातील मायबाप जनतेवर तरुण- तरुणी वर्गावर त्यांचा पूर्ण विश्वास आहे. आणि 50 वर्षानंतर आलेली ही विकासाची सुवर्णसंधी अजिबात सोडणार नाहीत, व बहुजन विकास सेनेच्या अधिकृत उमेदवार सौ. रुपाली रमाकांत आरज उर्फ रमा बाळू शेंडे आपल्या परिचयाच्या एकनिष्ठ मेहनतशील तालुक्याचा विकास करणाऱ्या व आपल्या तालुक्यातील जाणत्या कर्तबगार महिला आहेत. शहापूर तालुक्यातील उज्वल भविष्याची वाटचाल करण्यासाठी प्रथम आज शहापूर तालुक्यात बहुजन समाजातील उमेदवार जनतेच्या न्याय हक्कासाठी , न्याय, समता आणि सर्वसमावेशक विकासासाठी त्या त् रिंगणात उतरल्या आहेत. शहापूरच्या जनतेला अनेक प्रश्न भेडसावत आहेत शहापूरची जनता तेच तेच उमेदवारांचे चेहरे पाहून त्रस्त झाले आहेत. त्यांना नवीन जाणत्या, कर्तबगार चेहऱ्याची गरज भासू लागली आहे.. बहुजन विकास सेनेच्या उमेदवार सॊ.रूपाली आरज यांना मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. शहापूरच्या जनतेला विकास, रोजगार, रस्ते, लाईट, पाणी, आरोग्य, शिक्षण गोरगरिबांच्या सुखदुःखात सहभागी आणि हाकेला धावून येणाऱ्या आमदाराची गरज आहे. शहापूरची जनता या सर्व समस्या सोडविण्यासाठी विकासाचे पर्व असणाऱ्या नवीन जाणता चेहरा असणाऱ्या रूपाली आरज यांना पाहत आहेत. म्हणून आमच्या तालुक्याला महिला उमेदवार रूपाली आरज हव्या आहेत असे स्पष्ट मत शहापूरच्या जनतेकडून ऐकायला मिळते. आपले शांत,सरळ स्वभावामुळे तसेचत्यांनी शहापूरचा विकास आच माझा ध्यास!!! असा चंग बांधला आहे, शहापूरच्या विकासासाठी मला एक संधी द्या मी या संधीचं सोनं करेल, असे स्पष्ट मत त्यांनी केला आहे, बहुजन विकास सेनेच्या अधिकृत उमेदवार सॊ. रूपाली आरज उर्फ (रमा बाळू शेंडे ) ही निवडणूक लढत आहेत. राजेशकुमार शिर्के हे कुणबी समाजाचे असल्याकारणाने व बहुजन विकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष केंद्रस्थानी असल्याने त्यांचा देखील या मतदारसंघावर प्रभाव पडत आहे, असे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. महिला उमेदवार रूपाली आरज या देखील निवडणुकीला सामोऱ्या जात आहेत. त्या उमेदवारी लढवत आहेत जनतेने आपल्याला आमदारकीसाठी एक संधी द्यावी, मी त्या संधीचं सोनं करेल असा विश्वास त्यांनी जनतेला दिला. शहापूरच्या सर्व समस्या सोडवण्याचा अहोरात्र प्रयत्न करत राहील, शहापूरचा कायापालट करण्याचा ध्यास त्यांनी घेतला आहे , बहुजन विकास सेनेच्या अधिकृत उमेदवार सॊ.रूपाली आरज यांना प्रचंड बहुमताने शहापूरची जनता निवडून देईल असा हा सुज्ञ, जागृत, विचारी जनतेवर त्यांचा ठाम विश्वास आहे.
.jpg)

Post a Comment
0 Comments