कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्र 142 मतदार संघातील अपक्ष उमेदवार
कैलास रमेश लाल यांच्या प्रचार रॅलीला उदंड प्रतिसाद
ब्लॅक अँड व्हाईट
(कल्याण ) वार्ताहर : कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्र 142 मतदारसंघातील अपक्ष उमेदवार कैलास रमेश लाल चेनानी यांच्या उमेदवारीने सिंधी समाजाच्या नागरिकांच्या समस्यांना वाचा फुटणार आहे.प्रशासकीय पातळीवर गोरगरीब सिंधी जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आपण अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असून,चांगल्या मताधिक्याने आपला विजय होऊ शकतो असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
श्री. कैलास चेनानी हे नेहमीच लोकहितासाठी झटणारे, नागरिकांच्या समस्या समजून घेणारे, आणि त्यावर तत्परतेने उपाययोजना करणारे असे व्यक्तिमत्व आहेत. त्यांनी आपल्या नगरसेवक पदाच्या कारकिर्दीत आपल्या प्रभागात अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवले आहेत.त्यातून जनतेचा आपल्याला असलेला पाठिंबा बघून आपला मतदारसंघ अधिक प्रगत, सुव्यवस्थित व सुरक्षित बनवण्यासाठी त्यांना आपल्या विजयाची खात्री वाटते आहे.सध्या निवडणुकीच्या मैदानात सुरू असलेल्या सर्व पक्षांच्या प्रचाराच्या भाऊगर्दीत अपक्ष उमेदवार म्हणून कैलास चेनानी यांचा प्रचार लक्षवेधी ठरतो आहे.
.jpg)


Post a Comment
0 Comments