Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

कल्याण पश्चिमेत मशाल ला मिळाली अपक्ष उमेदवाराची साथ

 कल्याण पश्चिमेत मशाल ला मिळाली   अपक्ष उमेदवाराची साथ


 कल्याण पश्चिम येथील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) चे अधिकृत उमेदवार सचिन दिलीप बासरे यांना अपक्ष उमेदवार एलान बरमावाला यांनी समर्थन देऊन स्वतः चा प्रचार कार्य थांबविला आहे.

ब्लॅक अँड व्हाईट 

(कल्याण वार्ताहर)शुक्रवारी संध्याकाळी कल्याण येथील गीता सभागार मध्ये शिवसेनेचे विधानसभा सहसंघटक रूपेश चंद्रकांत भोईर यांच्या नेतृत्वाखाली एलान बरमावाला आणि त्यांच्या समर्थकांनी सचिन दिलीप बासरे यांच्या समर्थनात आपला प्रचार कार्य थांबविण्याची अधिकृत घोषणा केली आणि पुढे शिवसेनेच्या मशाल निशाणी चा प्रचार करण्यासाठी काम करण्याची घोषणा केली.  ह्या वेळी प्रसार माध्यमांशी बोलताना एलान बरमावाला यांनी सांगितले की मी बी एस यू पी प्रकल्प ग्रस्त लोकांना घर मिळाली पाहिजे हा मुद्दा घेऊन विधानसभा निवडणुकीत उतरलो होतो. पण रूपेश भोईर यांनी मला समजावून सांगितले की सदरचा मुद्दा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चे अधिकृत उमेदवार सचिन दिलीप बासरे यांनी स्वतः च्या घोषणापत्रात अगोदरच नमूद केलेला आहे. त्यामुळे आपला मुद्दा शिवसेनेने घेतलेला आहे. असे समजवून आपला समर्थन सचिन दिलीप बासरे यांना द्या . रूपेश भोईर यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी मी बासरे साहेबांना आपला समर्थन देऊन पुढे शिवसेनेचा प्रचार करणार . ह्या वेळी सचिन बासरे यांनी सांगितले की " समाजाच्या प्रत्येक घटकांसाठी शिवसेना वचनबध्द आहे. बी एस यू पी प्रकल्प बाधित लोकांना त्यांच्या हक्काचा घर मिळाली पाहिजे त्या साठी मी विशेष प्रयत्न करणार " . ह्या वेळी शिवसेना उप नेते अल्ताफ भाई शेख , शिवसेना उप शहर प्रमुख बाळा परब , वंडार कारभारी आणि जिल्हा सचिव जयेश वाणी समवेत शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments