डोंबिवली फास्ट ते डोंबिवली फर्स्ट हा वसा मी घेतला आहे. ....... .. मंत्री रविंद्र चव्हाण
रवींद्र चव्हाण यांच्या प्रचार रॅलीला उदंड प्रतिसाद
(डोंबिवली) वार्ताहर शांतताप्रिय डोंबिवली शहराच्या उन्नतीसाठी डोंबिवली फास्ट ते डोंबिवली फर्स्ट हा वसा घेतला आहे. हा वसा हाती घेऊनच गेल्या २०-२५ वर्षांपासून वाटचाल करत आहे आणि निरंतर करत राहणार असल्याचा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला.
या ऋणानुबंधाच्या बळावरच या निवडणुकीत डोंबिवलीत पुन्हा एकदा भाजप - महायुतीचे कमळच फुलणार असा विश्वास असल्याचे चव्हाण म्हणाले.महायुतीचे सर्व घटक त्यावेळी आवर्जून उपस्थित होते. ढोल ताशा, प्रचार गाणे यामुळे वातावरण एकदम भारून गेले होते.
--------
.jpg)



Post a Comment
0 Comments