अग्निशमन दलातील जवानांची कर्तव्यदक्षता
समयसूचकता दाखवत विजवली
नंदीग्राम एक्सप्रेसला लागलेली आग
ब्लॅक अँड व्हाईट/कल्याण वार्ताहर
कल्याणचे रहिवासी असलेले आणि मुंबई अग्निशमन दलात कर्तव्य बजावत असलेले गौरव पाटील आणि त्यांच्या इतर दोन सहकारी यांची कर्तव्यदक्षता सोमवारी पाहायला मिळाली. मुंबईहून नांदेड कडे जाणाऱ्या नंदिग्राम एक्सप्रेस गाडीच्या डब्याला कसारा घाट येथे शनिवारी रात्री एका गर्दुल्याने सिगारेट पेटवून टाकल्यामुळे गाडी खाली असणारे गवत व आजूबाजूला असलेले गवत पेटले व त्या डब्याला आग लागली होती. याच गाडीने प्रवास करणारे अग्निशमन दलातील दोन जवान विकास जाधव (वरळी अग्निशमन केंद्र) व अंकुश मदनकर (मांडवी अग्निशमन केंद्र), गौरव पाटील (इंदिरा डॉक) हे ड्युटी करून सुट्टीवर गावी जात होते.
नंदिग्राम एक्सप्रेसच्या डब्याला लागलेली आग पाहून त्यांनी मिळेल ते साहित्य वापरून प्रत्येकाने दोन एक्सटिंग्युशर वापरून व बाकीच्या लोकांनी पाणी मारुन, व डब्यातील बऱ्याच प्रवाशी लोकांना सुखरूप डब्याच्या बाहेर काढले. त्यांची हि समय सूचकता व कर्तव्यदक्षता पाहून तेथील प्रवाशांनी त्यांचे कौतुक केले. हे अग्निशामक जवान हे वरळी, मांडवी व इंदिरा डॉक अग्निशमन केंद्र येथे कार्यरत आहेत.
.jpg)


Post a Comment
0 Comments