Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

अंबरनाथ विधानसभा निवडणुक प्रचारात गुन्हेगारांची मांदियाळी !!

 अंबरनाथ विधानसभा निवडणुक प्रचारात गुन्हेगारांची मांदियाळी 

           ब्लॅक अँड व्हाईट/उल्हासनगर, प्रफुल केदारे:

देशभरातील राजकारणात गुन्हेगारांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढलाय. सध्या महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांच्या दुसर्या टप्प्यातील प्रचार जोर धरू लागलाय. सर्वच राजकीय पक्षांचे उमेदवार हे आपल्या प्रचारात रुसल्या फुगलेल्यां सोबत गुन्हेगारांनाही कवेत घेतांना दिसताहेत. त्यामुळे एकंदरीतच बलाढ्य राजकीय पक्ष हे अशा गुन्हेगारांना प्रचारात उतरवून अप्रत्यक्षपणे मतदार आणि अपक्ष उमेदवारांना दहशतीखाली आणण्याचा प्रयत्न करतायेत की, गुन्हेगारीचे उदात्तीकरण  करत आहेत. हे एक कोडं पडलंय. अंबरनाथ मध्ये तर काही गुन्हेगारच उमेदवारांच्या प्रचारात दिसुन येताहेत. अलिकडेच अंबरनाथ मधील रिक्षा युनियन नेते मिलिंद पाटील यांनी यावर पत्रकारांसमोर जाहीर नाराजीही व्यक्त केली होती.
१४१ अंबरनाथ विधानसभेत महायुतीचे उमेदवार डॉ बालाजी किणीकर यांच्या एका प्रचार रैलीत चक्क एका खुणा प्रकरणी तुरुंगवास भोगुन आलेल्या गुन्हेगारांचा सहभाग दिसून आलाय. अंबरनाथ मधील रिपाईचे नेते नरेश गायकवाड आणि अरविंद वाळेकर यांच्या वैमनस्य होते . त्यानंतर २००२ मध्ये अंबरनाथच्या चिंचपाडा परिसरात गायकवाड यांची त्यांच्या औफिस मध्येच धारदार शस्त्रांनी हत्या झाली. याप्रकरणी मारेकरी असणारे पापा सय्यद, इंदिन सय्यद, फिरोज पठाण, अन्वर पठाण यांच्यावर खुनाचा गुन्हा सिद्ध होऊन त्यांना जन्मठेप कारावासाची शिक्षा ठोठावली होती. यातील पापा सय्यद यांची शिक्षेतून मुक्तता झाली, तर इतरच सर्वच पैरोलवर बाहेर आहेत. 
          मात्र २०२१ मध्ये आजचे शिंदे गटाच्या शिवसेनेचे कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांच्या नेतृत्वात यापैकी इंदिन सय्यद , फिरोज पठाण व अन्वर पठाण यांना शिवसेनेत प्रवेश मिळाला होता.  यावेळी डॉक्टर बालाजी किणीकर देखील सोबत पाहायला मिळाले होते .  या प्रवेशानंतर नरेश गायकवाड यांचे चिरंजीव कबीर गायकवाड यांनी समाज माध्यमातुन एक व्हिडिओ प्रसारित करून शिवसेनेने गुन्हेगारांचे केलेल्या पुनर्वसनाबाबत संताप व्यक्त केला होता.
असे असतांनाही पापा सय्यद यांचे सख्खे भाचे फिरोज पठाण व अन्वर पठाण हे महायुतीचे किणीकर यांचा खुलेआम प्रचार करत असतील गुन्हेगारीमुक्त सरकार देण्याची हमी देणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रतिष्ठेस हे घातक ठरू शकतं.  तर दुसरीकडे दलित आणि मुस्लिम समाजासाठी आयुष्यभर मोठ्या प्रमाणात समाजकार्य करणार्या नरेश गायकवाड यांचे अनुयायी हे अशा गुन्हेगारांना पाठीशी घालणार्या उमेदवाराला मतदान करतील का, हे मतदानाच्या मतपेट्या उघडल्यानंतरच उघड होईल.

Post a Comment

0 Comments