शहापूर विधानसभा बहुजन विकाससेनेच्या अधिकृत उमेदवार रूपाली आरज (रमा बाळू शेंडे ) यांना उत्स्फूर्त प्रतिसाद
ब्लॅक अँड व्हाईट शाहपुर् वार्ताहर
शहापूर विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या बहुजन विकास सेनेच्या अधिकृत लोकप्रिय अपक्ष उमेदवार रूपाली रविकांत आरज रमा शेंडे या असंच छत्रपती शिवाजी महाराजांनी 12 बलुतेदार आणि 18 पगड जातींना सोबत घेत आपल्या स्वराज्याचे स्वप्न साकार केले आज त्या विचाराचे प्रेरणा घेत बहुजन विकास सेना आपल्या समोर शहापूरकरांसाठी आपल्या परिचयाच्या, एकनिष्ठ, मेहनतशील, तालुक्याचा विकास करणाऱ्या व आपल्या तालुक्यातील जाणत्या कर्तबगार महिला उमेदवार रूपाली आरज (रमा बाळू शेंडे ) या शहापूर तालुक्यातील उज्वल भविष्याची वाटचाल करण्यासाठी प्रथमच शहापूर तालुक्यात बहुजन समाजातील उमेदवार आपल्या न्याय हक्कासाठी न्याय समता आणि सर्वसमावेशक विकासासाठी त्या या रिंगणात उतरले आहेत. शहापूरच्या जनतेला आणि प्रश्न बेडसावत आहेत शहापूरची जनता तेच तेच उमेदवारांचे(चेहरे )पाहून अक्षरशः त्रस्त झाली आहे त्यांना नवीन, जाणत्या, कळकळीच्या चेहऱ्याची आवश्यकता भासत आहे.बहुजन विकास आघाडीच्या उमेदवार रूपाली आरज यांना मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे शहापूरच्या जनतेला विकास, रोजगार, रस्ते, लाईट, पाणी, आरोग्य, शिक्षण, गोरगरीबांच्या सुख - दुखात सहभागी आणि हाकेला धावून येणाऱ्या आमदाराची गरज आहे. शहापूरची जनता या सर्व समस्या सोडवण्यासाठी विकासाचे पर्व असणाऱ्या नवीन जाणता महिला चेहरा म्हणून रूपाली आरज (रमा बाळू शेंडे), यांना पाहत आहेत.
बहुजन विकास सेनेच्या अधिकृत उमेदवार आमदार म्हणून आमच्या तालुक्याला महिला उमेदवार रूपाली आरज हव्या आहेत, असे स्पष्ट मत शहापूरच्या जनतेकडून ऐकायला मिळते.... आपल्या शांत, संयमी, सरळ स्वभावामुळे व त्यांनी शहापूरचा विकास हाच माझा ध्यास! चंग बांधला आहे.शहापूरच्या विकासासाठी मला एक संधी द्या मीं संधीच सोन करेन? असे स्पष्ट मत त्यांच आहे. बहुजन विकास सेनेच्या अधिकृत उमेदवार रूपाली आरज( रमा शेंडे ) यांनी स्पष्ट केले.. विकास सेनेचे सर्वेसर्वा माने राजेश कुमार शिर्के हे कुणबी समाजाचे असल्याकारणाने व बहुजन विकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष केंद्रस्थानी असल्याने त्यांचा देखील या मतदारसंघावर प्रभाव पडत आहे असे चित्र सर्वत्र दिसून येत आहे महिला उमेदवार रूपाली आरोग्या देखील निवडणुकीस सामोरे जात आहेत त्यांचं शहापूरच्या जनतेला एकच सांगणं आहे की बहुजन विकास सेनेतून त्या उमेदवारी लढवत आहेत जनतेने आपल्याला आमदारकीसाठी एक संधी द्यावी त्या संधीच मी सोनं करून दाखवीन व शहापूरच्या सर्व समस्या सोडवण्याचा अहोरात्र प्रयत्न करत राहील,, शहापूरचा कायापालट करण्याचा ध्यास त्यांनी घेतला आहे, मी या शहापूरच्या कुटुंबातील एक सदस्य आहे व हे माझे कर्तव्य असणार आहे असे स्पष्ट मत त्यांनी केले आहे, मी एक प्रामाणिक महिला उमेदवार असून आपल्या तालुक्याच्या सर्व समस्या सोडण्यासाठी अहोरात्र प्रयत्नशील राहील असा विश्वास त्यांनी जनतेला दिला आहे.
.jpg)

Post a Comment
0 Comments