Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

शहापूर विधानसभा निवडणूक रंगतदार अवस्थेत

 शहापूर विधानसभा निवडणूक  रंगतदार अवस्थेत

जिजाऊ सामाजिक विकास पार्टीच्या प्रचाराने शहापुरात धरला जोर

                     ब्लॅक अँड व्हाईट/शहापूर प्रतिनिधी

   शहापूर विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 रंगतदार अवस्थेत पोहोचली असून प्रचाराची धावपळ जोरात सुरू झाली आहे, चौका चौकात सभा,   तालुक्यात जोरदारपणे प्रचार सभा,   घेतल्या जात आहे तसेच तालुक्यातील मतदारांना उमेदवारांच्या भेटीगाठीचे प्रमाण वाढत आहे.  ज्या ज्या पक्षाचे उमेदवार,  तालुक्यातील वेगवेगळ्या क्षेत्रांमधील जे मान्यवर, तसेच जनता यांच्या भेटीगाठी घेत असून मतदारांना आपल्या कार्याची / कामाची पावती देत आहेत.                                           शहापूर विधानसभा 135 च्या जिजाऊ सामाजिक विकास पार्टीच्या अधिकृत उमेदवार    रंजना उघडा, यांच्या प्रचाराने तर तालुक्यात भरारी मारली आहे.  वाडा,तालुक्यात तसेच गाव - खेडे,,पाडे,  वाड्या- वस्त्या,याठिकाणी मोठ्या प्रमाणात जोर आला असून, शहापुरातील प्रचारातही जोर वाढला आहे. असे असून जनता  मोठ्या प्रमाणात जिजाऊला पाठिंबा देत आहे.             मागे झालेल्या सार्वत्रिक लोकसभेच्या निवडणुकीत जिजाऊ सामाजिक संघटनेच्या माध्यमातून आपल्या सामाजिक कार्याच्या बळावर नुकताच पार पडलेल्या निवडणुकीत जिजाऊचे संस्थापक अध्यक्ष सर्वेसर्वा निलेश सांबरे  यांनी आपले प्राबल्य दाखवले आहे. शहापूर विधानसभा मतदारसंघातून त्यांना मोठ्या प्रमाणात मते पडले होती, लोकसभेत जनतेने त्यांच्यावर दाखवलेला विश्वास आणि जिजाऊचे सामाजिक कार्यें, यामुळे निलेश सांबरे यांच्या जिजाऊ विकास पार्टीला जनतेकडून  मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. मंगळवार दिनांक 12 नोव्हेंबर रोजी शहापूर तालुक्यातील गोठेघर, बोरशेती, शेरेपाडा,कळंबे, वाफे , सापगाव,शिवनेरी मानगाव,धसई, शेलवली( खंडोबा )कासगाव,  दोऱ्याचापाडा,  हिव, खुटघर,  कोळकेवाडी या अशा गावात जिजाऊ सामाजिक विकास पार्टीच्या, उमेदवार रंजना उघडा यांचा प्रचारदौरा पार पडला..  अनेक  गावपाड्यांमधून  रंजना उघडे यांना पाठिंबा मिळत आहे, तर 

 जिजाऊचे सर्वेसर्वा प्रचारात केंद्रस्थानी असल्याने त्यांचा देखील मतदारांवर प्रभाव पडत असल्याचे चित्र दिसत आहे,   शिलाई मशीन हे चिन्ह घेऊन जिजाऊ विकास पार्टीचे अपक्ष उमेदवार   रंजना उघडा 135 शहापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीला सामोरे जात आहेत. जिजाऊ सामाजिक विकास पार्टी सारख्या सामाजिक काम करणाऱ्या संघटनेचा एक उच्चशिक्षित व सुशिक्षित उमेदवार जर आमदार म्हणून शहापूरला मिळाला तर शहापूरचा कायापालट नक्की होईल असा विश्वास शहापूरकर व्यक्त करीत आहेत.

Post a Comment

0 Comments