Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

इंग्रजी शाळांना मोठ्या प्रमाणात परवानगी दिल्याने मराठी शाळांची संख्या कमी - विधान परिषद आमदार ज. मो. अभ्यंकर

 इंग्रजी शाळांना मोठ्या प्रमाणात परवानगी दिल्याने मराठी शाळांची संख्या कमी 

- विधान परिषद आमदार ज. मो. अभ्यंकर 


         ब्लॅक अँड व्हाईट/कल्याण वार्ताहर 

बहुजन शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संसदेच्या वतीने जागृती मेळावा संपन्न 

 इंग्रजी शाळांना मोठ्या प्रमाणात परवानगी दिल्याने मराठी शाळांची संख्या कमी झाली असल्याचे मत  विधान परिषद आमदार ज. मो. अभ्यंकर यांनी व्यक्त केले. कल्याणमध्ये बहुजन शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संसदेच्या वतीने जागृती मेळाव्याचे आयोजन आचार्य अत्रे रंगमंदिर याठिकाणी केले होते. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. 

मराठी शाळा बंद होण्याची मुख्यत्वे दोन कारणे असून त्यापैकी एक म्हणजे मोठया प्रमाणात राज्य सरकारने इंग्रजी शाळांना परवानगी दिली आहे. गेल्या 7 ते 8 वर्षात तब्बल 10 हजाराच्या वर इंग्रजी शाळा मंजूर केल्या. त्यामुळे गाव पातळीवर देखील इंग्रजी शाळा झाल्या. मात्र याठिकाणी इंग्रजी भाषेत शिक्षण देणारे शिक्षकच उपलब्ध नाहीत. या इंग्रजी शाळांमध्ये मराठी शाळांमधील विद्यार्थीच प्रवेश घेत असल्याने या विद्यार्थ्यांच्या स्थलांतरामुळेच मराठी शाळा ओस पडल्या आहेत. 

दुसरं कारण म्हणजे मराठी शाळांचा दर्जा चांगला राखला जाऊ शकला नाही. याला राज्य शासनाचे धोरण कारणीभूत आहे. शासनाच्या 2015 च्या धोरणामुळे शिक्षकांची संख्या कमी झाली असून यामुळेच मराठी शाळांची संख्या कमी झाली असल्याची टीका विधान परिषद आमदार ज. मो. अभ्यंकर यांनी केली आहे.

यावेळी बहुजन शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संसदेचे अध्यक्ष डॉ. अशोक बहिरव, माजी शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य सुनील चौहान, नॅशनल कॉलेज कल्याणचे प्राचार्य अब्दुला खान आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments