बदलापूर पुर्वेत पोद्दार इंटरनॅशनल ब्रियो किड्सची नवीन शाखा सुरू
मध्यमवर्गीय पालकांना परवडणाऱ्या फि मध्ये
जागतिक दर्जाच्या सुविधांसह उत्कृष्ट शिक्षण देण्याचे आश्वासन
ब्लॅक अँड व्हाईट/उल्हासनगर, प्रफुल केदारे :
आजच्या जागतिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी इंग्रजी भाषा अनिवार्य ठरलीय. नवीन पिढीला उत्कृष्ट शिक्षण मिळण्यासाठी पोद्दार ब्रियो इंटरनॅशनल स्कूल ही अनेक शाखा असलेली अग्रगण्य शिक्षण संस्था आहे. बदलापूर खरवयी , पुर्व मध्ये आघाडीवर असलेल्या या शाळेची बदलापूर पश्चिमेला पोद्दार ब्रियो किड्स या नावाने नवीन शाखा सुरू करण्यात आलीय. या
मध्यमवर्गीय पालकांना परवडणाऱ्या फि मध्ये आपल्या पाल्यांना प्रारंभिक शिक्षणा पासून उच्च माध्यमिक स्तरापर्यंत शिक्षणाची सोय पोद्दार ब्रियो इंटरनॅशनल स्कूल मध्ये प्राधान्याने लक्ष केंद्रीत केले जाते. या किड्सच्या उद्घाटन प्रसंगी संस्थेचे पदाधिकारी , शिक्षकवर्ग, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याठिकाणी, २०२५ शैक्षणिक सत्रा करिता प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. या शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास साधण्यासाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम आणि जागतिक दर्जाच्या सुविधां शाळाच्या वतीने देण्यात प्रदान करण्यात येत आहे. यामध्ये शासनाच्या शिक्षण हक्क विधेयकाच्या मार्गदर्शित तत्त्वांनुसार अभ्यास सत्र, मेंटाॅरशिप कला क्रीडा कौशल्य, आणि सह अत्याधुनिक जलतरण तलाव, मैदान, व्यापक शैक्षणिक अभ्यासक्रम, विद्यार्थ्यांची काळजी, विकास विभाग, प्रदर्शन कला, आणि सर्जनशील अभिव्यक्ती आदीं बाबींवर विशेष लक्ष दिले जाते. यासाठी तज्ञ शिक्षक उपलब्ध आहेत.अशी माहिती शाळेच्या मुख्याध्यापिकां रेशमी सिंग यांनी दिली.
.jpg)


Post a Comment
0 Comments