Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

डोंबिवलीतील पाणी टंचाईबाबत शिवसेनेने घेतली आयुक्तांची भेट कल्याण : डोंबिवली पश्चिमेतील

 डोंबिवलीतील पाणी टंचाईबाबत शिवसेनेने घेतली आयुक्तांची भेट

           ब्लॅक अँड व्हाईट/कल्याण वार्ताहर

डोंबिवली पश्चिमेतील साईनगर येथील सर्व चाळींना व अनमोल नगरी मधील न्यू ओमकार, विघ्नेश पार्क, विघ्नहर्ता पार्क, साई भक्ती पार्क, शिवसाई दर्शन, मल्हार वेणू ह्या परिसरातील गेल्या दोन महिन्यांपासून कमी दाबाचा पाणी पुरवठा होत आहे. नागरिकांच्या या समस्येकडे पालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि पाणी पुरवठा त्वरित सुरळीत चालू करण्याकरिता शिवसेना डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे, उप शहरप्रमुख गोरखनाथ (बाळा) म्हात्रे, अनमोल म्हात्रे, कोरगांवकर, मालती पतंगे व इतर नागरिकांसह मिळून कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त इंदुराणी जाखड यांना पाणी पुरवठा पूर्ववत करण्यासाठी निवेदन देण्यात आले.


Post a Comment

0 Comments