कल्याण पूर्वेत राधाकृष्ण नेत्रालय
व सुपरस्पेशालिटी आय हॉस्पिटलचे उद्घाटन
ब्लॅक अँड व्हाईट/कल्याण वार्ताहर
कल्याण पूर्वेतील लक्ष्मीबाग नाना पावशे चौक येथे गेल्या सहा ते सात वर्षां पासून जुने राधाकृष्ण नेत्रालय हॉस्पिटल होते. हे हॉस्पिटल स्वातंत्र दिनाचे औचित्य साधून साई सुमन टॉवर पहिला माळा तिसगाव कल्याण पूर्व येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. या हॉस्पिटलचे डॉ.संकेत निरगुडे व डॉ.ज्योती घिंडानी हे प्रमुख नेत्र सर्जन म्हणून पती-पत्नी दांपत्य काम पाहणार आहेत. या उद्घाटन सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संचालक मनोरमा नेत्रालय माजी नेत्रविभाग प्रमुख जे जे हॉस्पिटल मुंबईच्या डॉ रागिणी पारेख ह्या होत्या. त्यांच्याहस्ते फीत कापून उद्घघाटन करण्यात आले. या समयी प्रमुख पाहूणे सामाजिक कार्यकर्ता आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड या उपस्थित होत्या.
या समयी हॉस्पिटलला भेट देण्यासाठी व डॉक्टर संकेत ज्योती यांना शुभेच्छा देण्यासाठी कोळसेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम, वाहतूक विभाग कल्याण पूर्व सचिन सांडभोर महाराष्ट्र स्टेट सिंधी साहित्य अकॅडमीचे व माजी नगरसेवक उल्हासनगर महेश सुखरामाणी, आयएमएचे डॉ. प्रशांत पाटील, कल्याण पूर्व माजी नगरसेवक निलेश शिंदे, महेश गायकवाड, सचिन पोटे, विशाल पावशे, विक्रम तरे, अभिमन्यु गायकवाड, विष्णू गायकवाड, अण्णा रोकडे, मिलिंद बेळमकर, देवचंद आंबादे, विविध संघटनेचे अधिकारी पदाधिकारी डॉक्टर मित्रमंडळी आप्तेष्ट नातेवाईक यांनी हॉस्पिटलला भेट दिली व शुभेच्छा दिल्या.
.jpg)

Post a Comment
0 Comments