राष्ट्र ध्वजाच्या अवमाना विरोधात वंचितचा उद्रेक....
ब्लॅक अँड व्हाईट/उल्हासनगर, प्रतिनिधी
नुकताच देशभरात स्वातंत्र्य दिन साजरा केला गेलाय. या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात घरघर तिरंगाची मोहीम राबवण्यासाठी जनतेला प्रोत्साहित केलं होतं. मात्र, या मोहिमेने देश वासियांच्या मनात देश निष्ठतेची भावना जागृत झाली तर, दुसरीकडे मात्र तिरंगाची आचारसंहिता नष्ट होऊन ठिकठिकाणी त्याचे अवमान झालेले पाहायला मिळालेत. उल्हासनगर शहरात देखील हे चित्र पाहायला मिळालं याबाबत वंचित बहुजन आघाडीने आपला तीव्र संताप व्यक्त केलाय. वंचितने निवेदन देऊन हे अस्ताव्यस्त पडलेले ध्वज प्रशासनाने सन्मानपूर्वक संकलित करून ते सुरक्षित पणे सांभाळून योग्य विल्हेवाट लावावी ही मागणी वंचित केली आहे.
घरघर तिरंगा हा सोहळा साजरा करताना तिरंगा ध्वजाची आचारसंहितेचे पालन करणे ही स्थानिक स्वराज्य संस्था व तहसीलदार नैतिक व कायदेशीर जबाबदारी आहे मात्र महानगरपालिका ती पाळण्यास कमी पडलीय
शहरात कचरा कुंडी, मटण - चिकनची दुकानं, ,दारूचे बार अशा जागांवर राष्ट्रीय ध्वज लावून राष्ट्रीय ध्वजाचा शहरभरात अपमान केला गेलाय. तसेच, सुर्यास्तानंतर ते उतरलेही गेले नाहीत. याच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी उल्हासनगर पच्छिमचे अध्यक्ष उज्वल महाले यांच्या नेतृत्वाखाली ईश्वरभाऊ सोनवणे, .निलेश देवडे, .विजय पगारे,. आदींनी उपायुक्त डॉक्टर सुभाष जाधव यांची भेट घेऊन प्रशासनास यावर कारवाई करण्याचे निवेदन दिले आहेआदींनी उपायुक्त डॉक्टर सुभाष जाधव यांची भेट घेऊन प्रशासनास यावर कारवाई करण्याचे निवेदन दिले आहे
.jpg)

Post a Comment
0 Comments