Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

दुबईत भव्य मराठी नृत्य स्पर्धा उत्साहात संपन्न

दुबईत भव्य मराठी नृत्य स्पर्धा संपन्न 



                        ब्लॅक अँड व्हाईट/कल्याण वार्ताहर 

दुबईतील सामाजिक संघटना एस के जी ग्रुप म्हणजेच शिवाजी काका ग्रुप यांचा ४ था वर्धापन दिन ग्लेनडेल इंटरनॅशनल स्कूल येथे साजरा करण्यात आला.
यावेळी भव्य मराठी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.ज्यामध्ये लहान थोरान पासून ते वयोरुद्ध यांच्या कडून सुंदर नृत्य सादर करण्यात आले.
एस के जी ग्रुप म्हणजेच शिवाजी काका ग्रुप हा युएई मधील होतकरू महिलांच्या न्याय हक्का  साठीं उभारलेला आहे. या कार्यक्रमाचे आयोजन शिवाजी काका,  साक्षी मोरे, संतोष भस्मे, सूचना नाईक,  किशोर मुंढे, मिलिंद मानके यांच्या सह कार्यकारी मंडळी मंगेश, अंबिका, स्वरा, जाफ़रीन, रीना, पुष्पा, प्रमिला पवार, रिता, शालिनी यांनी केले.

या कार्यक्रमाला डॉ बु अब्दुल्ला, सचिन कदम, चंद्रशेखर जाधव, अभिजित देशमुख, अमित मनोहर, प्रियांशी दुबे भट्ट, श्री गणेश भजनी मंडळाचे  विठोबा अहिरे, सुशांत चिल्लाळ, रत्नाकर दंडवते, शारदा करडक, निलेश देशपांडे, मंदार  कुलकर्णी या सर्व दुबईतील प्रसिद्ध उद्योजक व मान्यवरांनी उपस्थिती लावली. यावेळी प्रमुख स्पर्धा निरीक्षक ललित स्वामी व मीनल पारंगे होते. डिजे निकीन घोडके यांनी सर्व संगीत कार्यभार सांभाळला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  साक्षी मोरे, ऋतुजा काळे-विचारे व सुनीता ढोकरे यांनी केले.

Post a Comment

0 Comments