Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

कल्याण पूर्वेतील समस्यांबाबत सुलभा गायकवाड यांनी घेतली आयुक्तांची भेट

 कल्याण पूर्वेतील समस्यांबाबत सुलभा गायकवाड यांनी घेतली आयुक्तांची भेट


                    ब्लॅक अँड व्हाईट/कल्याण वार्ताहर 

कल्याण पूर्वेतील रखडलेली विकास कामे व सर्वसामान्य नागरिकांच्या समस्यांबाबत कल्याण पूर्वेचे आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी कल्याण पुर्वेतील सर्व मुख्य व उप रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करणे, कल्याण पूर्वेत होणारा दूषित पाणीपुरवठा, कल्याण पूर्वेतील नांदिवली, चिंचपाडा, आशेळे, माणेरे येथिल पाणी टंचाई, दररोज कचरा उचलला न गेल्यामुळे शहरात सर्वत्र पसरलेला कचरा, सार्वजनिक शौचालयाचे झालेली दुरावस्था, १०० फुटी रोड मधील बाधित झालेल्या माधव अपार्टमेंट मधील नागरिकांचे पुनर्वसन करणे, संतोषनगर जवळील नाल्यावरील कलवर्ट (सी.डी.वर्क) ३० मीटर रुंद करणे, विठ्ठलवाडी स्मशानभूमी जवळील नाल्यावरील कलवर्ट (सी.डी.वर्क) ३० मीटर रुंद करणे तसेच पाण्याचा निचरा योग्य प्रकारे होण्यासाठी नाल्यावरील कलवर्टची रुंदी वाढविणे, यासारख्या अनेक समस्यांवर चर्चा केली.फक्त आश्वासन न देता लवकरात लवकर या सर्व समस्यांवर तोडगा काढण्याच्या सूचना सुलभा गायकवाड यांनी आयुक्तांना केल्या. यावर आयुक्तांनी देखील सकारात्मक भूमिका घेऊन सर्व समस्या तातडीने सोडविण्यात येतील असे आश्वासन दिले.


Tags

Post a Comment

0 Comments