Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

केडीएमसी प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे भले मोठे होर्डिंग कोसळून तीन जण जखमी;

 केडीएमसी प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे भले मोठे होर्डिंग कोसळून तीन जण जखमी

कल्याण डोंबिवलीतील  महाकाय होर्डिंगच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर


              ब्लॅक अँड व्हाईट/कल्याण वार्ताहर 

  कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे कल्याण पश्चिमेतील सहजानंद चौकात लावण्यात आलेले एक मोठे होर्डिंग अचानक कोसळून तीन नागरिक जखमी झाले तर अनेक गाड्यांचे नुकसान झाले आहे. आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

कल्याण पश्चिमेतील सहजानंद चौक परिसरात रस्त्याच्या चारी बाजूला मोठमोठे होर्डिंग उभारण्यात आले आहे. या होर्डिंगच्या सुरक्षेचा प्रश्न वारंवार उपस्थित करूनही महापालिका प्रशासन त्याकडे कानाडोळा करत असतानाच आज ही घटना घडली आहे. आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास सहजानंद चौकात काझी हॉस्पिटल शेजारील हे भले मोठे होर्डिंग अचानक खाली कोसळले. ज्यामध्ये तीन नागरिक जखमी झाले असून अनेक टू व्हीलर, काही रिक्षा आणि एका फोर व्हीलरचे  नुकसान झाले आहे.तर आज सकाळी होत असलेल्या जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे कल्याण पश्चिमेतील सहजानंद चौक येथे लावण्यात आलेल्या होर्डिंग्जच्या पुढील बाजूस लावलेले बॅनर्सचे पत्रे  पडल्याने खाली उभ्या असलेल्या गाडीचे नुकसान झाले. ही घटना घडताच महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड़, अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, मालमत्ता विभागाचे उपायुक्त रमेश मिसाळ यांनी घटनास्थळी भेट देवून परिस्थितीचा आढावा घेतला.

या होर्डिंगवर ज्यांनी बॅनरचे पत्रे लावले आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाईल, त्याचप्रमाणे ज्या लोकांचे नुकसान झाले त्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत संबंधित कंत्राटदारावर जबाबदारी निश्चित करण्यात येईल, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड़ यांनी यावेळी दिली. त्याचप्रमाणे महापालिकेच्या सर्व प्रभागातील कार्यक्षेत्रात सर्व होर्डिंगची पाहणी करुन सुस्थितीत आहेत किवा कसे ? तसेच या होर्डिंगवरील लावलेले बॅनर योग्यरीतीने लावला आहे किवा कसे ? याबाबत प्रभागांचे सहा. आयुक्तांनी प्रत्यक्ष पाहणी करुन अहवाल सादर करावा, असे निर्देश महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड़ यांनी दिले आहेत.

 


Post a Comment

0 Comments