Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

केडीएमटीमध्ये प्रतिनियुक्तीवर आलेले परिवहन सेवेचे व्यवस्थापक बेकायदेशीर?

 केडीएमटीमध्ये प्रतिनियुक्तीवर आलेले परिवहन सेवेचे व्यवस्थापक बेकायदेशीर?


                   ब्लॅक अँड व्हाईट/कल्याण वार्ताहर 

नगरविकास विभागाने जळगाव महानगरपालिकेत उपायुक्त पदावर कार्यरत असलेले डॉक्टर दीपक सावंत यांची एक वर्षाकरिता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत प्रतिनियुक्तीने नियुक्ती केली होती. मात्र तीन वर्षाचा कालावधी उलटूनही परिवहन सेवेचे व्यवस्थापक पद अनधिकृत पणे सावंत सांभाळत असल्याचा आरोप शिवसेनेचे विधानसभा सहसंघटक रुपेश भोईर यांनी केला आहे. यामुळे दोन वर्षापेक्षा जादाचा व्यवस्थापक पदाचा कार्यभार परिवहन सेवेत सुरू असल्याने सावंत यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

एकीकडे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या परिवहन सेवेबद्दल सर्व सामान्य प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागत असल्याने परिवहन सेवा कायम यामुळे चर्चेत राहिली आहे. नगररचना विभागाचे तत्कालीन अवरसचिव सचिन सहस्त्रबुद्धे यांनी डॉक्टर सावंत हे जळगाव महापालिकेत उपायुक्त पदावर कार्यरत असताना त्यांची 15 मार्च 2021 रोजी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत एक वर्षाकरिता प्रतिनियुक्तीवर नियुक्ती केली होती. परिवहन सेवेत गेल्या तीन वर्षापेक्षा अधिक डॉक्टर सावंत व्यवस्थापक म्हणून आपला कार्यकाळ सांभाळत आहेत.

माहितीच्या अधिकारात शासनाने एक वर्षाकरिता सावंत यांची नेमणूक केल्याचे रुपेश भोईर यांनी उघड केले असल्याने अनधिकृत पणे सावंत परिवहन सेवेचे व्यवस्थापक म्हणून कारभार हाकत असल्याने येथे आश्चर्य व्यक्त केले गेले आहे. शासन प्रतिनियुतीवर पाठवीत असणाऱ्या अधिकाऱ्याला ठराविक कालावधी करता नियुक्त करीत असतो. मात्र पालिकेच्या परिवहन सेवेत व्यवस्थापक पदी दोन वर्षापेक्षाही अधिकचा काळ सावंत उपभोगत असल्याने प्रतिनिधी संदर्भात येथे मात्र सावळा गोंधळ उडाल्याचे दिसून येत आहे.

पालिकेच्या परिवहन विभागात अगोदरच गोंधळाची परिस्थिती असून व्यवस्थापक पदावर दीपक सावंत बेकायदेशीर बसले असल्याने त्यांची चौकशी करण्याची मागणी शिवसेनेचे विधानसभा सहसंघटक रुपेश भोईर यांनी निवेदनाद्वारे केली आहे. परिवहन विभागात किती बसेस आहेत, किती बसेस भंगारात काढल्या गेले आहेत तसेच रोजचा तिकीट संख्या देखील परिवहन मुख्यालयाकडे उपलब्ध नसल्याचे भोईर यांनी म्हटले आहे. राज्यातील अन्य महापालिकेत परिवहन सेवा प्रवाशांकडून क्यू आर कोड वापरून डिजिटल पद्धतीने भाडे आकारात असताना कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या परिवहन सेवेत मात्र डिजिटल सेवा नसल्याचे सांगण्यात येत आहे.

याबाबत परिवहन सेवेचे व्यवस्थापक डॉक्टर दीपक सावंत यांच्याशी वारंवार संपर्क साधून प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. तसेच सावंत यांना पाठवण्यात आलेल्या संदेशालाही त्यांनी प्रतिसाद न दिल्याने या वादग्रस्त नियुक्ती संदर्भात त्यांची प्रतिक्रिया देण्यास त्यांनी टाळाटाळ केल्याचे दिसून येत आहे.


Tags

Post a Comment

0 Comments