Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

उंबर्ली येथील जागेच्या सर्वेक्षणास शेतकऱ्यांचा विरोध

 उंबर्ली येथील जागेच्या सर्वेक्षणास शेतकऱ्यांचा विरोध

              ब्लॅक अँड व्हाईट/कल्याण वार्ताहर 

 ग्रामीण भागातील उंबर्ली परिसरात जागेच्या मालकी हक्कावरुन शेतकरी आणि खाजगी बिल्डरचा वाद सुरु आहे. बिल्डरकडून जागेच्या सर्वेक्षणासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना जमलेल्या शेकडो शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला. यावेळी काही महिला तरुणांच्या हातात डिझेलने भरलेले कॅन होते त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला मात्र वाद वाढत होता घटनेची माहिती मिळताच शिवसेना शहर प्रमुख राजेश मोरे घटनास्थळी पोहचले. येत्या दोन दिवसात खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासोबत बिल्डर आणि शेतकरी यांची बैठक घेऊन या प्रकरणी तोडगा काढला जाईल, शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेण्यात येईल, जो पर्यत निर्णय होत नाही तोपर्यत सर्वे होऊ देणार नाही असे आश्वासन दिले. त्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.

उंबर्ली गावात साडे सहा एकरची जागा आहे. या जागेच्या सर्वेक्षणाकरीता खाजगी बिल्डरने कर्मचारी बोलावले होते. या जागेवर मालकी हक्का संबंधीत वाद असल्याने सर्वेक्षणाकरीता आलेल्या कर्मचाऱ्यांना  शेतकरयानी तीव्र विरोध केला. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहचले. सर्वेक्षणाला विरोध झाल्याने हा वाद जवळपास चार ते पाच तास सुरु होता. सर्वेक्षणाला विरोध करण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यासोबत महिला वर्गही मोठ्या प्रमाणात सहभागी झाला होता.महिला आणि शेतकरी यांनी त्यांच्या हातात डिझेलने भरलेले कॅन आले होते. त्यामुळे या ठिकाणी तणाव निर्माण झाला होता. तणावाची परिस्थिती पाहता त्याठिकाणी डोंबिवली शिवसेना शहर प्रमुख राजेश मोरे घटनास्थळी पोहचले. शहर प्रमुख मोरे यांनी येत्या दोन दिवसात बिल्डर आणि शेतकरी यांना एकत्रित बसवून या प्रकरणी तोडगा काढला जाईल असे आश्वासन दिले आहे. मोरे यांनी दिलेल्या आश्वासनानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.

Post a Comment

0 Comments