Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

डोंबिवलीत नवांकुर् साहित्य संस्थेचे गठन

 डोंबिवलीत नवांकुर् साहित्य संस्थेचे गठन

                ब्लॅक अँड व्हाईट/डोंबिवली वार्ताहर

 डोंबिवलीत सर्वभाषिक नव लेखकांना प्रोत्साहीत करण्यासाठी नवांकुर् साहित्य संस्थेचे गठन करण्यात आले आहे. संस्थेचे संस्थापक अवधेश यदुवंशी आणि लक्ष्मी यादव यांनी संस्थे तर्फे पहिली काव्य गोष्टी रविवारी आयोजित केली . ह्या गोष्टीत प्रमुख अतिथी म्हणून वरिष्ठ पत्रकार आणि कवि कर्ण हिन्दुस्तानी, विशिष्ठ अतिथी साहित्य अकादमी पुरस्कार विजेता पवन तिवारी , राम स्वरूप साहू समवेत हिन्दी व उर्दू चे साहित्यकार उपस्थित होते. संस्थेचे संस्थापक अवधेश यदुवंशी आणि लक्ष्मी यादव यांनी अधिक माहिती देताना सांगीतले की लवकरच संस्थेला पंजीकरण करून कार्यकारिणी जाहिर करण्यात येईल . नवांकुर् साहित्य संस्थे तर्फे हिन्दी, मराठी समवेत सर्व भाषिक नव साहित्यकाराना प्रोत्साहीत करण्यात येईल. सध्या संस्था डोंबिवली साठी कार्यान्वित राहिल. नंतर संस्थेचा विस्तार करण्यात येईल.

Post a Comment

0 Comments