Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

कल्याण डोंबिवली शहरात पावसाचा हाहाकार



 कल्याण डोंबिवली शहरात पावसाचा हाहाकार


पालिका क्षेत्रातील खाडी किनारी, गणेश घाट  सह सखल भागात  शिरले पावसाचे पाणी
शहरातील २४६ कुटुंबाच्या घरी पाणी शिरले तर ६४० बाधित नागरिकांना स्थलांतरित केले


                   ब्लॅक अँड व्हाईट/कल्याण वार्ताहर  

गेल्या दोन दिवसा पासून पडणाऱ्या मुसळधार पावसाने कल्याण डोंबिवली शहराला चांगलाच तडाखा दिला असून शहरात धुंवाधार पावसा मुळे खाडी किनारी पाण्याची पातळी वाढल्याने तसेच शहरातील सखल चाळी  परिसरात पावसाचे पाणी साचल्याने शहरात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती.

कल्याण डोंबिवली शहरातील नदी, खाडी किनारी तसेच गणेश घाट, नजीकच्या व सखल भाग आदी ३१ ठिकाणी पावसाचे पाणी साचले होते. तर सुमारे २४६ कुटुंबाच्या घरात पावसाचे पाणी शिरल्याने ६४० नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले. गेल्या चोवीस तासात कल्याण तालुका मध्ये १८९ मी.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर गुरुवारी सकाळी सहा पासून दुपारी चार वाजे पर्यात १०९ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाल्याची माहिती सूत्रांनी मिळाली आहे.

    कल्याण डोंबिवली शहराला गेल्या दोन दिवसा पासून पावसाने चांगलेच झोडपले. पावसाने बुधवारी रात्री पासून चांगलाच जोर धरल्याने कल्याण पश्चिममे कडील खाडी किनारी असलेल्या भागांना पावसाचा तडाखा पडला. कल्याण खाडीतील पाण्याची पातळी वाढल्याने खाडीचे पाणी लागत असलेल्या गोविंद वाडी, रेतीबंदर परिसरातील चाळी मधील घरा मध्ये शिरल्याने या घरातील नागरिकांना त्वरित स्थानिक रहिवाशांनी इतरत्र हलविण्यात आले. गोविंद वाडी परिसरातील तबेल्या मध्ये ही खाडीचे पाणी शिरल्याने तब्ल्यातील म्हशींना गोविंद वाडी दुर्गाडी रस्त्यातील  दुभाजकावर बांधून ठेवण्यात आले.  काळू व उल्हास नदी ने पाण्याची पातळी ओलांडल्याने या दोन्ही नदीच्या किनाऱ्या वर असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता.

कल्याण स्टेशन परिसर, बाजारपेठ, आंबेडकर रोड, शहाड, आडीवली ढोकली तसेच खाडी किनारी असलेले अशोक नगर ,वालधुनी ,योगिधाम,घोलप नगर, खडेगोळवली, डोंबिवलीतील पलावा, कोपर गाव, आयरे गाव, गरिबाचा पाडा, राजीव नगर, कुंभारखान पाडा  आदी सुमारे ३१ ठिकाणीच्या किनारी असलेल्या २४६ कुटुंबाच्या घरा मध्ये पावसाचे पाणी शिरले असल्याने या घरातील ६४० नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थालांतरीत करून सुमारे साडे सहाशे नागरिकांना फूड पाकीट वाटल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली. तर शहरात अन्य १९ ठिकाणी पाणी साचल्याची तर आधारवाडी येथे झाड पडल्याची तक्रार पालिकेच्या आपत्कालीन विभागा कडे नोंद करण्यात आली होती.

टिटवाळा मध्ये देखील सखल भागात पाणी साचल्याने चाळीच्या घरामध्ये पावसाचे पाणी शिरले. टिटवाळा येथील जावईचा पाडा, भालचंद्र नगर, बंदरपाडा, मोहने यादव नगर आदी सखल ठिकाणी देखील पाणी साचले होते.

सिटी पार्क बुडाले

करोडो रुपये खर्च करून स्मार्ट सिटीच्या माध्यमातून योगदान परिसरात उभारलेल्या सिटी पार्कला पुन्हा एकदा पुराचा तडाखा बसला आहे. संपूर्ण सिटी पार्क पाण्याखाली गेल्याने कल्याणमधील विरंगुळ्यासाठी असलेले एकमेव सुंदर उद्यान केवळ सहा महिन्यात बेरंग झाले आहे.

Tags

Post a Comment

0 Comments