मनसे विधान सभेच्या मैदानात
225/250 जागा लढविणार
मनसे २२५ ते २५० जागांवर निवडणूक लढवणार आहे. यासाठी त्यांनी कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत.
ब्लॅक अँड व्हाईट/मुंबई वृत्तसेवा
मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी गुरुवारी मुंबईतील पक्षाच्या मेळाव्यात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले. या वेळी त्यांनी पक्षाची रणनीती, उमेदवारांची निवड आणि इतर महत्त्वाच्या बाबींचे स्पष्टीकरण दिले.मनसे २२५ ते २५० जागांवर निवडणूक लढवणार आहे. यासाठी त्यांनी कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत. कोणाशी युती होईल किंवा आपल्यासाठी कोणती जागा सुटेल, याचा विचार न करता आपल्याला स्वबळावर लढायचे आहे, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे मनसे महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणार नसल्याचे तूर्तास स्पष्ट झाले आहे.राज ठाकरे यांनी सांगितले की, निवडणुकांपूर्वी इतर पक्ष सर्वेक्षण करतात, पण मनसेने यावेळी आपल्या चार ते पाच लोकांची टीम प्रत्येक जिल्ह्यात पाठवून सर्वेक्षण पूर्ण केले आहे. त्यांनी सांगितले की, मनसेच्या तालुकाध्यक्षांना याची पूर्वकल्पना नव्हती. या सर्वेक्षणाचा अहवाल आता त्यांच्या हातात आहे.आगामी विधानसभा निवडणुकीत मनसेकडून निवडून येण्याची क्षमता असलेल्या लोकांनाच उमेदवारी दिली जाईल, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले. तिकीट मिळालं की मी पैसे काढायला मोकळा अशा मनोवृत्तीच्या कोणत्याही व्यक्तीला तिकीट दिले जाणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
तसेच, पक्ष सोडण्याच्या तयारीत असलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर टीका करताना ठाकरे म्हणाले की, आपल्यातील काही लोक जाण्याच्या तयारीत असल्याचे चर्चेत आहे. मी त्यांच्यासाठी रेड कार्पेट घालेन, त्यांनी खुशाल दुसऱ्या पक्षात जावे आणि स्वत:चे नुकसान करुन घ्यावे.या वक्तव्यांमुळे मनसेच्या आगामी निवडणूक रणनितीबद्दलचा उत्साह वाढला आहे. शिवतीर्थवर महायुतीचे नेते राज ठाकरे यांची मनधरणी करण्यासाठी जातील का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
.jpg)

Post a Comment
0 Comments