सेव्ह पेंढरकर कॉलेज मोहिमेची शिक्षण संचालक कार्यालयावर धडक
ब्लॅक अँड व्हाईट/कल्याण वार्ताहर
सेव्ह पेंढरकर कॉलेज मिहिमेचे आयोजक सोनू सुरवसे यांच्या नेतृत्वात डोंबिवली ते पुणे अशा कार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी, आजी व माजी शिक्षक - शिक्षकेत्तर कर्मचारी, डोंबिवलीतील स्थानिक भूमिपुत्र अशा जवळपास १०० पेक्षा जास्त आंदोलकांनी सहभाग घेतला.
उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळणकर यांच्या कार्यालयात त्यांची भेट घेऊन समस्या मांडण्याचा प्रयत्न सोनू सुरवसे यांनी केला. डोंबिवलीतील अनुदानीत महाविद्यालय विना अनुदानित करण्याचा घाट घालून हजारो गोर गरीब, कष्टकरी आणि स्थानिक भूमी पुत्राच्या मुलांना शिक्षण संधिंपासून वंचित ठेवण्याचा जो प्रयत्न महाविद्यालय करीत आहे त्याला शिक्षण संचालक, सह संचालक यांचा पाठिंबा आहे का याचा जाब विचारण्यासाठी धडक मोर्चा आयोजित केला गेला.
सुमारे तीन तास मागणी करून देखील शिक्षण संचालक शैलेंद्र देवळणकर यांनी आंदोलन कर्त्यांना एकत्रित भेट दिली नाही. भर पावसात विद्यार्थी व आंदोलन करणाऱ्यांना उभे करून मी सर्वांना एकत्रित भेटणार नाही हा हट्ट त्यांनी सोडला नाही. महाविद्यालय बाहेर गेल्या ४० दिवसांपासून माजी विद्यार्थ्यांचे जे आंदोलन सुरू आहे त्याची पुरेशी दखल न घेता चर्चा करण्याचे टाळले. शेवटी काही मोजक्याच प्रतिनिधींना भेटण्याचे मान्य करून चर्चा न करता केवळ प्रकरण न्याय प्रविष्ट आहे मी त्यासंदर्भात जास्त बोलू शकत नाही असे सांगितले.
प्रतिनिधींनी विचारलेल्या कोणत्याही प्रश्नांना समाधानकारकपणें उत्तरे दिली नाहीत. आम्ही या प्रकरणात वकिलांचा सल्ला घेत असून सरकार तुमच्या पाठीशी आहे व आम्ही कॉलेजचा प्रश्न सोडवू असे सांगितले. महाविद्यालयावर प्रशासक बसविण्याची प्रक्रिया सुरू असताना मंडळाच्या अध्यक्षांना कारणे दाखवा नोटीस दिल्या नंतर त्यांना मुदत का वाढवून दिली आणि याच काळात मंडळाच्या अध्यक्षांनी कारणे दाखवा नोटीसला कोर्टात जाऊन स्टे कसा आणला या सोनू सुरवसे यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर संचालकांनी दिले नाही.
.jpg)

Post a Comment
0 Comments