Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

आकाशवाणी मुंबईवर ‘पुस्तकांवर बोलू काही’ विशेष मालिकेचे आयोजन

 

                   ब्लॅक अँड व्हाईट ​मुंबई वार्ताहर

आकाशवाणी मुंबईच्या 'अस्मिता' वाहिनीवर 'ऐसी अक्षरे रसिके - पुस्तकांवर बोलू काही' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. चांगल्या पुस्तकांशी श्रोत्यांची गढूळ मैत्री जोडण्याच्या उद्देशाने ही मालिका सुरू केली जात आहे.

​या कार्यक्रमाचे लेखन आणि निवेदन शुभांगी पासेबंद यांनी केले असून, गुरुनाथ तेरवणकर हे या मालिकेचे सादरकर्ते आहेत.

​हा विशेष कार्यक्रम २१ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत दररोज सकाळी ७.०० वाजता आणि दुपारी १.५५ वाजता प्रसारित केला जाईल. श्रोत्यांना हा कार्यक्रम आकाशवाणीच्या 'अस्मिता' वाहिनीवरून तसेच News On Air या मोबाईल ॲपवरही ऐकता येणार आहे. पुस्तकप्रेमींनी या विशेष मालिकेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

Post a Comment

0 Comments