Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

आदित्य ठाकरेंवरील आरोपांचे पुरावे द्या.....वरुण सरदेसाईंचे थेट आव्हान


                  ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 
दिशा सालियान प्रकरणावरून शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करणाऱ्यांनी एक तरी ठोस पुरावा समोर आणावा, असे आव्हान शिवसेना ठाकरे गटाचे  आमदार वरुण सरदेसाई यांनी केले. पुरावे समोर आल्यास त्याला कायदेशीर उत्तर दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. पक्षाच्या आढावा बैठकीसाठी कल्याण-डोंबिवली दौऱ्यावर आले असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करणाऱ्यांनी पुरावे सादर करावेत. पुरावे असतील तर ते समोर आणावेत, त्याला कायदेशीर उत्तर आम्ही देऊ, असे सरदेसाई म्हणाले. तसेच ‘मातोश्री’ हे मोठे नाव असून, मातोश्रीवर गेल्याने प्रसिद्धी मिळते, अशी टिप्पणीही त्यांनी केली.

यावेळी बलात्काराचा गुन्हा दाखल असलेले भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या अटकेचा मुद्दाही सरदेसाई यांनी उपस्थित केला. विरोधी पक्षातील एखाद्या नेत्यावर छोटासा गुन्हा दाखल झाला तरी सत्ताधारी पक्षाचे प्रवक्ते त्यावरून टीका करतात आणि त्यानंतर मीडिया ट्रायल सुरू होते. मात्र, नरेंद्र पवार यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांच्यावर कारवाई कधी होणार, असा सवाल सरदेसाई यांनी उपस्थित केला. नरेंद्र पवार यांना तातडीने अटक झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

दरम्यान, कल्याण-डोंबिवली महापालिकेतील राजकीय परिस्थितीवरही सरदेसाई यांनी भाष्य केले. केडीएमसीमध्ये अद्याप विरोधी पक्षनेत्याची निवड झालेली नाही, तसेच नवनिर्वाचित नगरसेवकांच्या नियुक्तीबाबतही ठोस निर्णय झालेला नसल्याचे त्यांनी सांगितले.

शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये सुरू असलेल्या राजकीय वादावरूनही त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. दोन्ही पक्षांमध्ये भांडण सुरू आहे, मग नागरिकांची कामे कधी होणार, असा सवाल वरुण सरदेसाई यांनी उपस्थित केला.


Post a Comment

0 Comments