ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
मानपाडा पोलीस स्टेशन हद्दीत माणगाव येथे एका बिल्डरने स्थानिक भूमिपुत्रांच्या चाळींवर परप्रांतीय बिल्डरने ५० ते ६० बाउन्सर आणि तीन जेसीबीसह प्रवेश करत चाळी तोडण्यास सुरवात केली होती. तसेच शेतकरी भूमिपुत्र आणि महिलांना देखील बाउन्सरने मारहाण केल्याची घटना घडली होती. यामध्ये अनेक जण जखमी झाले आहेत.
या घटनेनंतर मोठा तणाव निर्माण होऊन देखील पोलिसांनी संबंधित बिल्डरवर गुन्हा दाखल केला नव्हता. याबाबत २७ गाव सर्व पक्षीय हक्क सरंक्षण संघर्ष समितीने हस्तक्षेप करत या प्रकरणी सबंधित बिल्डरवर गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरली होती.
याबाबत आज संघर्ष समिती आणि भूमिपुत्रांनी मानपाडा पोलिसांची भेट घेतली. त्यानुसार याप्रकरणी संबंधित बिल्डर आणि इतर सहकाऱ्यांवर मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या आरोपींना त्वरित अटक करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
बिल्डर रामेश्वर गुप्ता याने माणगाव येथील ठाकूर कुटुंबियांच्या चाळींवर जेसीबी घेऊन जात चाळी तोडण्यास सुरवात केली होती. यामध्ये अनेकांना बाउन्सरने मारहाण देखील केली होती. या प्रकारा नंतर पोलिसांनी गंभीर कलमे लावली नव्हती, जे मुख्य आरोपी होते त्यांची नावे देखील लावली नव्हती. यासाठी प्रयत्न करून देखील काही निष्पन्न होत नसल्याने या कुटुंबियांनी २७ गाव सर्व पक्षीय हक्क सरंक्षण संघर्ष समितीकडे धाव घेतली.
भूमिपुत्रांच्या न्याय हक्कांसाठी उभी ठाकणारी संघर्ष समिती अशी ओळख असलेल्या समितीने याबाबत आक्रमक भूमिका घेत या प्रकरणी आवश्यक कलमे आणि उख्य आरोपींची नावे या गुन्ह्यात लावून घेण्यास पाठपुरावा केला. या पाठपुराव्यानुसार याप्रकरणी दोषी असलेल्या रामेश्वर गुप्ता आणि इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित बिल्डरने आगरी समाजाचा अपमान केला असून त्याने सर्व समाजाची माफी मागावी अशी मागणी हर्षदा अमोल ठाकूर यांनी केली आहे.
तर शेकऱ्यांच्या जमिनीवर कब्जा करण्याची प्रवृत्ती वाढत चालली असून यावर आळा घालावा या मागणीसाठी २७ गाव सर्व पक्षीय हक्क सरंक्षण संघर्ष समितीने मानपाडा पोलिसांची भेट घेतली. यानंतर पोलिसांनी योग्य कलमे लावणे, मुख्य आरोपींवर गुन्हा दाखल करून संबंधितांना लवकरच अटक करण्याचे मान्य केले आहे. यापुढे आगरी समाजावर कोणी बोलण्याचा प्रयत्न केल्यास योग्य उत्तर दिले जाईल. आज समाज ठाकूर परिवारासोबत असल्याची प्रतिक्रिया समितीचे उपाध्यक्ष सत्यवान म्हात्रे यांनी दिली.
.jpg)



Post a Comment
0 Comments