Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

आगरी युथ फोरम तर्फे विद्यार्थ्यांचा गुणगौरव

"शॉर्टकटने कोणतेही सक्सेस मिळत नाही"                                     _ अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय जाधव

शैक्षणिक प्रगती साधण्यासाठी विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन

गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान म्हणजे समाजाच्या उज्ज्वल भविष्याचा सन्मान

                   ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

शॉर्टकट ने कोणतेही सक्सेस मिळत नाही, स्वप्न जरी मोठी असली तरी त्याचे प्रयत्न विरुद्ध दिशेला असतात. टेक्नॉलॉजीचा वापर चांगल्या पद्धतीने करा, जे काही कराल त्यात सातत्य ठेवून त्यात वेगळेपणा ठेवा असा सल्ला अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय जाधव यांनी विद्यार्थ्यांना दिला. आगरी युथ फोरम डोंबिवली तर्फे सालाबादप्रमाणे कल्याण ग्रामीण मधील उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा डोंबिवली पूर्वेतील होरायजन हॉल येथे शनिवारी आयोजित करण्यात आला होता यावेळी ते बोलत होते.



आगरी समाजातील गुणवंत विद्यार्थी
, विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती तसेच समाजातील प्रावीण्य मिळविणाऱ्या मान्यवरांचा सन्मान, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देणं आणि समाजातील मुलांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या हेतूने आयोजित या कार्यक्रमात दहावी बारावी ग्रॅज्युएट सीए अशा विविध यशस्वी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय जाधव, माजी मंत्री जगन्नाथ पाटील,  आमदार राजेश मोरे, आमदार सुलभा गायकवाड, एसीपी सुहास नेमाडे, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे माजी संचालक दिगंबर दळवी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदिपान शिंदे, आगरी युथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वजे, अनेक पदाधिकारी व ग्रामीण भागातील विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते.




यावेळी बोलतांना संजय जाधव यांनी सांगितले कि, जेन झी आणि मिलेलीयम मधली गॅप कमी करण्यासाठी आम्हालाही अभ्यास करावा लागेल. शहरी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना देखील शिक्षणासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. छोटे छोटे कोर्स देखील आयुष्याचं बस्तान बसविण्यासाठी मदत करतात.आपल्या इथे लोकसंख्या मोठी असल्याने, सर्व्हिस सेक्टर मोठा असून रोजगाराच्या संधी देखील मोठ्या आहेत. आपण स्वतः शिकून इतरांना रोजगार दिला पाहिजे.

       या उपक्रमासाठी आगरी युथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे, उपाध्यक्ष शरद पाटील, सरचिटणीस रामकृष्ण पाटील, कार्याध्यक्ष जालिंदर पाटील, खजिनदार पांडुरंग म्हात्रे, सचिव गुरुनाथ म्हात्रे तसेच संपूर्ण आयोजक व व्यवस्थापक मंडळाने मेहनत घेतली.  


Post a Comment

0 Comments