Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

देशी पिस्तुलांसह 10 जिवंत काडतुसे जप्त,दोन आरोपी अटकेत


                  ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

कल्याणजवळील बल्याणी परिसरात एका कारची झडती घेतली असता दोन देशी पिस्तुले आणि 10 जिवंत काडतुसे आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी ठाणे गुन्हे शाखेच्या  पथकाने रोशन गोंधळी आणि त्याचा साथीदार कृष्णा यादव यांना अटक केली आहे. ही शस्त्रे नेमकी कोणत्या उद्देशाने आणण्यात आली होती, याचा तपास टिटवाळा पोलीस करीत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे एलसीबीचे पोलीस अधिकारी भाऊसाहेब गायकवाड यांना माहिती मिळाली होती की, बल्याणी परिसरात रोशन गोंधळी याच्या कारमध्ये शस्त्रे ठेवण्यात आली आहेत. या माहितीच्या आधारे एलसीबीच्या पथकाने संबंधित कारची तपासणी केली. यावेळी कारमधून दोन देशी पिस्तुले आणि 10 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.

पोलिसांनी रोशन गोंधळी आणि कृष्णा यादव यांना ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी टिटवाळा पोलिसांच्या स्वाधीन केले. दोघांना कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

रोशन गोंधळी याचा परिसरात दबदबा असल्याचे सांगण्यात येत असून त्याच्याविरोधात यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. जप्त केलेली पिस्तुले आणि काडतुसे कोणी दिली, ती आणण्यामागे नेमका काय उद्देश होता तसेच कोणत्या गुन्ह्याची तयारी केली जात होती का, या सर्व बाबींचा तपास सुरू आहे. पोलीस अधिकारी विशाल चोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली टिटवाळा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.




Post a Comment

0 Comments