ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात संघटितपणे अनैतिक वेश्याव्यवसाय करणाऱ्या संघटित टोळीवर कल्याण पोलीसांनी मोक्का कायद्यान्वये कारवाई केली आहे. अशाप्रकारे वेश्याव्यवसायाच्या गुन्ह्यात पहिल्यांदाच मोक्काची कारवाई करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक होनमाने यांनी दिली.
वेश्याव्यवसायाबाबत कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हयात अटक केलेल्या महिला व पुरूष आरोपी यांनी आपसात संगनमत करुन एकुण २० बळीत महीलांना वेश्याव्यवसायासाठी भाग पाडुन, त्यांना पैशाचे आमिष दाखवुन, त्यांचा वापर शरीरसंबंधासाठी मुलींची मागणी करणाऱ्या ग्राहकांसोबत वेश्यागमनासाठी पाठवुन त्याद्वारे मिळणाऱ्या आर्थिक उत्पन्नावर स्वतःची उपजिवीका करुन अपव्यापार करीत होते.
गुन्हयाच्या तपासात अटक केलेल्या महिला आरोपी व पुरूष आरोपी यांच्याकडे आर्थिक स्त्रोताचा कोणताही कायदेशीर मार्ग नसुन त्यांनी संघटीतपणे टोळी तयार करुन टोळीच्या व स्वतःच्या आर्थिक फायद्याकरीता ते जबरदस्तीने बळीत महिला मुलींचा वेश्यागमनासाठी अनैतिक व्यापार करण्यासाठी वापर करुन संघटीतपणे गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाले. या टोळीचा बिमोड करणेकरीता नमुद गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ चे कलम ३(१) (ii), ३ (२), ३ (४) या कलमांचा अंतर्भाव करण्याबाबत अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, कल्याण यांच्याकडुन मंजुरी प्राप्त झाल्याने गुन्हयात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ च्या प्रमाणे कलमांचा अंतर्भाव करण्यात आला आहे.
या गुन्हयातील आरोपींचा न्यायालयाच्या परवानगीने कल्याण जिल्हा कारागृह येथुन ताबा घेवुन गुन्हयात फेरअटक करण्यात आली. मोक्का न्यायालय, ठाणे यांनी आरोपींची पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केली होती. ६ जुलै पासून या आरोपींना न्यायालयीन कोठडी मंजुर करण्यात आली आहे.
हि अपर पोलीस आयुक्त संजय जाधव यांच्या मार्गदर्शनुसार पोलीस उप आयुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शन व देखरेखीखाली वपोनि बळीरामसिंग परदेशी, पोनि विजय नाईक, सपोनि स्वप्नील भुजबळ व त्यांच्या पथकाने केली असुन गुन्हयाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक होनमाने हे करीत आहेत.
.jpg)



Post a Comment
0 Comments