Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

केडीएमसी महापौरांनी प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन घेतला पावसाच्या परिस्थितीचा आढावा

 

महापौर पाहणी दौऱ्यात नाल्यावरील अतिक्रमणेभराव रडारवर

                  ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

कल्याण डोंबिवली महानगरपालिका महापौर हर्षाली चौधरी यांनी गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसाचा आणि  तुंबापुरी झालेल्या भागाचा दौरा करीत परिस्थितीचा आढावा घेत प्रशासनाला उपाययोजना करण्याचे आदेश दिले.
       गेली दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे गटारे, नाले, तुंबल्याने  सखल भागात पाणी शिरले. या पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी महापौर आँन फिल्डवर उतरत त्यांनी शहाड, वडवली, अटाळी, आंबिवली, मांडा पश्चिम, टिटवाळा पुर्व, इंदिरानगर, बल्याणी परिसराचा आधिकारी स्थानिक लोकप्रतिनिधी समवेत पाहणी  केली. यावेळी सखल भागात पाणी शिरल्याचा तसेच नाले, गटारे यांचा पाण्याचा निचारा होण्यासाठी तातडीने मार्ग काढण्याच्या सुचना केल्या.तसेच जेसीबीच्या सहाय्याने प्रवाह मोकळा करून पाण्याचा निचारा होईल,याकडे भर दिला. तसेच नाल्यांच्या काठावर झालेली अनाधिकृत अतिक्रमणे, अनाधिकृत भराव  तातडीने काढून टाकण्याच्या सुचना सहाय्यक आयुक्तांना केल्या.


तसेच सखल भागात पाणी शिरल्याने त्या परिसरात प्रभाग क्षेत्र अधिकारी जयवंत चौधरी यांच्या पथका मार्फत ५०० जेवणाचे पाकिटं तसेच पाणीबॉटल वाटण्यात आले. तसेच डोंबिवली लोधा हेवन गावदेवी चौक  येथे झालेल्या अपघाताची पाहणी करून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्याला रुग्णालयात जाऊन दुखापतीची चौकशी करून डॉक्टरांना आदेश करून तत्काळ निवारण करण्यात आले.
डोंबिवली पूर्वेतील टिळक रोड परिसरात उभारण्यात येत असलेल्या महापालिकेच्या  कॅन्सर रुग्णालयाच्या बेसमेंटसाठी सुरू असलेल्या खोदकामामुळे शेजारील दोन इमारतींजवळील संरक्षण भिंत अचानक कोसळल्याने याठिकाणचा देखील पाहणी दौरा करण्यात आला.




Post a Comment

0 Comments