गत पाच - सहा दिवसांपासून बरसणाऱ्या मुसळधार पावसामुळे काळू व शाई नदी परिसरातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे बहुसंख्य शेतजमिनीचे बांध फुटून जमिनी खरवडून निघाली आहेत. शेतकऱ्यांनी आर्द्रा नक्षत्रात पेरणी केलेली भाताची रोपे पूर्णपणे कुजून पिवळी पडली असून दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे.
आज काळू नदी धरणग्रस्त सामाजिक संस्था यांच्या पदाधिकारी यांनी शेतकरी नेते हरिभाऊ राऊत यांच्या नेतृत्वाखाली मुरबाडचे तहसीलदार अभिजित देशमुख यांना निवेदन देत त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी केली आहे. बळीराजा पूर्ण हवालदिल झाला असून मेहनत आणि खर्च वाया जाण्याची भीती निर्माण झाली असल्याने शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आवश्यकता असल्याचे संस्थेचे अध्यक्ष संभाजी फणाडे म्हणाले.
यावेळी संस्थेचे कोषध्यक्ष शाम देशमुख, सचिव विलास पठारे, कार्याध्यक्ष बापू देशमुख, सहचिटणीस कैलास निमसे, सह -कोशाध्यक्ष रोशन चौधरी यांचेसह माहिती अधिकार महासंघ ठाणे चे जिल्हाध्यक्ष संतोष राऊत , मुरबाड तालुका कुणबी समाजोन्नती मंडळाचे सहचिटणीस संभाजी गोडांबे , शेतकरी प्रतिनिधी जयवंत राऊत व खुटल बा. चे उपसरपंच भावेश पठारे आदि उपस्थित होते.
.jpg)


Post a Comment
0 Comments