शाखाप्रमुख चेतन म्हामुणकर यांचे केडीएमसी आयुक्तांना पत्र
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्र. ६ चिकणघर गावठाण मधील म्हसोबा रिक्षा स्टँड ते नामदेव विहार - मनाली हाईटस् पर्यंतच्या बॉक्स नाल्यावरील रस्ता खड्डे मुक्त करणे तसेच चिकणघर गावठाण मधील म्हसोबा रिक्षा स्टँड ते नामदेव विहार पर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण करण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली असून याबाबत शिवसेना शाखा प्रमुख चेतन म्हामुणकर यांनी केडीएमसी आयुक्तांना पत्र दिले आहे.
प्रभाग क्र. २७ चिकणघर गावठाण मधील म्हसोबा रिक्षा स्टँड ते नामदेव विहार पर्यंतच्या रस्त्याच्या एका बाजुने मोठमोठे टॉवर उभे राहिले असुन काही ठिकाणी फुटपाथ बनले आहेत, परंतु रस्त्याच्या दुसऱ्या बाजुने गटार किंवा फुटपाथ नसल्याने पावससाचे पाणी जमा होऊन मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने नागरीकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. तसेच या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतुक सुरु असल्याने वारंवार वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे.
.jpg)





Post a Comment
0 Comments