ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या निरोगी, दीर्घायुष्य आणि यशस्वी सार्वजनिक जीवनासाठी डोंबिवलीच्या ग्रामदैवत श्री गणपती मंदिरात भव्य महाआरतीचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन आशुतोष सिंग, दुर्गेश चव्हाण, सुजल म्हात्रे आणि अभिषेक यादव यांनी केले होते.
कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष नंदकिशोर परब तसेच ठाणे विभागीय प्रसिद्धीप्रमुख दिपेश म्हात्रे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने महिला व पुरुष उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देत त्यांच्या उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि यशस्वी नेतृत्वासाठी श्री गणरायाच्या चरणी प्रार्थना केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शेतकरी, कामगार, विद्यार्थी,महिला, युवक तसेच समाजातील सर्व घटकांच्या विकासासाठी सातत्याने कार्यरत असून त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विकासाच्या नव्या उंचीवर पोहोचत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
महाआरतीनंतर उपस्थितांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आणि जनकल्याणासाठी त्यांच्या नेतृत्वाला अधिक बळ मिळावे, अशी सामूहिक प्रार्थना केली.
.jpg)


Post a Comment
0 Comments