Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरला संतेपाडा शाळेतील इयत्ता पाचवीचा विद्यार्थी

           ब्लॅक अँड व्हाईट (मोहने  )गीता गायकर /ऐनकर 

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे (MSCE Pune) घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल नुकताच जाहीर झाला असून, यामध्ये कल्याण तालुक्यातील मानिवलीपाडा उर्फ संतेपाडा येथील इयत्ता पाचवीचा विद्यार्थी हर्ष प्रदीप संते या विद्यार्थ्याने घवघवीत यश संपादन केले आहे. हा विद्यार्थी या वर्षीच्या अधिकृत गुणवत्ता व पात्रता यादीत पात्र ठरला असून त्याने शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.यंदा या राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षेसाठी महाराष्ट्रभरातून लाखो विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

 राज्याचा एकूण निकाल साधारण २२.९७ टक्के लागला असून स्पर्धा अत्यंत कठीण होती. अशा अटीतटीच्या परीक्षेत संतेपाड्याचे शिक्षक भाऊराया चौधर या शिक्षेकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्याने शिष्यवृत्तीसाठीची आवश्यक पात्रता मिळवून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला सिद्ध केले आहे.त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्याने मिळवलेले हे यश इतर सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरले आहे. शिक्षकांनी घेतलेले विशेष वर्ग आणि विद्यार्थ्याची चिकाटी यामुळेच हे यश शक्य झाले आहे ," अशी प्रतिक्रिया शाळेय शिक्षक चौधर सरांनी दिली. यशस्वी विद्यार्थ्यावर सध्या सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांकडून कौतुकाचा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.विद्यार्थ्याच्या या यशाची बातमी समजताच संतेपाडा परिसरात आणि शाळेत एकच जल्लोष करण्यात आला. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आणि लहानपणापासून काका काकींचे प्रयत्न व  शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन आणि स्वतःच्या कठोर परिश्रमाच्या जोरावर या विद्यार्थ्याने हे यश मिळवले आहे.या यशाबद्दल सर्वत्र जिल्हापरिषद शाळा संते पाड्याचे इयत्ता पाचवीतील या विद्यार्थी व शिक्षकांचे  कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments