Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

डोंबिवलीत शिवसेनेतर्फे १,५०० विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप

खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपक्रमांतर्गत राबविण्यात आला कार्यक्रम

                     ब्लॅक अँड व्हाईट डोंबिवली वार्ताहर 

 शिवसेनेच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचा आधार देण्याच्या उद्देशाने मोफत वह्या वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यमान नगरसेवक व कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे गटनेते विश्वनाथ वसंत राणे यांच्या प्रभागातील सुमारे १,५०० विद्यार्थ्यांना या उपक्रमातून मोफत वह्यांचे वितरण करण्यात आले.




गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक मदत मिळावी, या उद्देशाने खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून दरवर्षी मोफत वह्या वाटपाचा उपक्रम राबविला जातो. यावर्षी कल्याण लोकसभा मतदारसंघात तब्बल १० लाख वह्यांचे वाटप करण्याचा संकल्प करण्यात आला असून, त्यानुसार शिवसेनेच्या प्रत्येक नगरसेवकाच्या प्रभागात हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे.

जुनी डोंबिवली येथील जन गण मन शाळेच्या प्रांगणात विश्वनाथ राणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. परिसरातील विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाचा लाभ घेतला.






यावेळी युवा सेना शहर समन्वयक प्रतीक राणे, विभाग प्रमुख अजय पांचाळ, शाखाप्रमुख धनाजी चौधरी, जितेंद्र नाचरे, उपशाखाप्रमुख विनायक राणे व स्वप्नील पुजारे, शाखा संघटक रुचिका मोरे व तन्वी इंगळे, महिला उपशहर संघटक कल्पना कांबळी, महिला शहर संघटक सीमा आयर, महिला विभाग प्रमुख सीमा डोळस यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

या उपक्रमामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचा दिलासा मिळाल्याने पालकांनी समाधान व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments